शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘विहिंप’चे ‘मिशन इंडिया हेल्थ’

By admin | Updated: February 28, 2015 02:21 IST

‘विहिंप’चे (विश्व हिंदू परिषद) नाव घेताच डोळ्यासमोर येते आक्रमक हिंदू संघटना. परंतु सुवर्णजयंती वर्षात ‘विहिंप’ने सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी जनमानसांत

योगेश पांडे नागपूर ‘विहिंप’चे (विश्व हिंदू परिषद) नाव घेताच डोळ्यासमोर येते आक्रमक हिंदू संघटना. परंतु सुवर्णजयंती वर्षात ‘विहिंप’ने सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी जनमानसांत जास्तीतजास्त पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘विहिंप’चा आजच्या तारखेतील महत्त्वाकांक्षी सेवाप्रकल्प म्हणजे ‘इंडिया हेल्थ लाईन’. देशातील गरीब जनतेला खासगी डॉक्टरांसोबत जोडण्यासाठी ‘विहिंप’ने काही महिन्यांपूर्वी ‘इंडिया हेल्थ लाईन’ची सुरुवात केली आहे. या प्रकल्पानुसार ‘विहिंप’ने देशभरातील ४० हजार डॉक्टरांना जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे ५ हजार डॉक्टर याअंतर्गत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील गरीब जनतेला पैशांअभावी खासगी डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही व अनेकदा उपचाराअभावी त्यांचे हाल होतात. हीच बाब लक्षात ठेवून ‘विहिंप’ने खासगी डॉक्टरांना एकत्र जोडण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत देशातील विविध भागांत या डॉक्टरांकडून जनतेला मोफत सेवा पुरविल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय ग्रामीण भागांत ‘हेल्थ अ‍ॅम्बेसेडर’देखील निर्माण करून प्राथमिक स्वरुपाच्या चाचण्या व उपचार नागरिकांना मिळावे यादृष्टीनेदेखील प्रयत्न आहेत. घरवापसीच्या मुद्यावर परत आक्रमक झालेले ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वात अनेक ज्येष्ठ पदाधिकारी या प्रकल्पावर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्रावर राहणार भरआजच्या तारखेत ‘विहिंप’चे देशभरात विविध क्षेत्रांतील ३२ हजार हून अधिक सेवाप्रकल्प सुरू आहे. तरीदेखील ‘इंडिया हेल्थ लाईन’अंतर्गत देशात चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवेचे जाळे तयार करण्याचा ‘विहिंप’चा मानस आहे. यात ‘हेल्पलाईन’देखीलआजच्या घडीला दिल्ली, भोपाळसारख्या मोठ्या शहरांत सुरू झाली आहे. लवकरच देशातील इतर शहरांतदेखील हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेषत: ‘विहिंप’चा महाराष्ट्रावर भर राहणार असल्याची माहिती देण्यात आली.