शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस विकी डोनर’ हिट

By admin | Updated: June 7, 2015 03:07 IST

स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ती शक्य झाली आहे.

‘एग डोनेशन’साठी तरुणींकडून विचारणासुमेध वाघमारे नागपूरस्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ती शक्य झाली आहे. ‘स्पर्म डोनर’सोबतच आता ‘एग डोनर’च्या माध्यमातून गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरत आहे. विशेष म्हणजे, सरोगसीपेक्षा सोपा आणि लवकर पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून हल्ली तरुणी ‘एग डोनेशन’कडे वळलेल्या आहेत. परिणामी, ‘विकी डोनर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेले ‘स्पर्म डोनेशन’च्या तुलनेत ‘एग डोनेशन’ हिट ठरत आहे. तरुणींकडून यासंदर्भात इस्पितळात विचारणा होत आहे.बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचे (इन्फर्टिलिटी) प्रमाण वाढत चालले आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. भारतामध्ये १८ ते ३५ वयोगटातील १० टक्के दाम्पत्यांमध्ये वंध्यत्व आढळते. ताणतणाव, लठ्ठपणा, शहरी जीवनपद्धती, व्यसनाधिनता, व्यावसायिक बंधने यामुळे वंध्यत्व दिसते. अनेकदा करिअर, उच्च राहणीमान मिळविण्याच्या धावपळीत वय वाढत जाते आणि नंतर दाम्पत्य डॉक्टरांकडे धाव घेतात. मुले होत नाहीत, म्हणून बऱ्याचदा स्त्रीला दोषी ठरवले जाते. पण योग्य समुपदेशन व तंत्रज्ञानामुळे याचा फायदा दाम्पत्याला होत असल्याचे चित्र आहे. यात ‘एग डोनर’ची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. एग डोनेशनच्या पूर्ण प्रक्रि येला किमान १५ दिवस लागतात. या दिवसांत रोज एक इंजक्शन दिलं जातं. त्यासाठी प्रति दिवस ठरलेली रक्कम देऊ केली जाते.स्त्रीबीज देणे गुन्हा नाही नियमानुसार स्त्रीबीज देणे हा गुन्हा नाही. मात्र, ते कुणी द्यायला हवे याचे काही नियम आहेत. वर्षातून कमीतकमी तीन वेळा स्त्रीबीज देता येते. २१ ते ३५ वयोगटातील स्त्री, विवाहित महिला स्त्रीबीज दान करू शकते. तिला स्वत:चं एक मुल असणं गरजेचं आहे. ती शिकलेली असावी. व्यंग नसावे. ‘एग डोनेशन प्रोग्राम’प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले, स्त्रीबीज दान करणाऱ्या महिलेला संपूर्ण ‘एग डोनेशन प्रोग्राम’ची माहिती दिली जाते. पहिल्या टप्प्यात तिची रक्ताची चाचणी आणि सोनोग्राफी केली जाते. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट करून तिला कोणताही आजार नसल्याची खात्री करवून घेतली जाते. या प्रकियेत मासिकपाळी येण्यापूर्वी स्त्रीबीजाची संख्या वाढविणारे हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर पुढील महिन्यात येणाऱ्या मासिकपाळीच्या चौथ्या दिवशी स्त्रीबीज काढून टाकण्यात येतं. याला किमान १५ दिवस लागतात.