शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही ...

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही सुरू झाल्या आहेत. ९ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी सुरू झाल्या आहेत; पण बोर्डाच्या परीक्षेबाबत कुठलेही नियोजन नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात आहेत. दुसरीकडे सीबीएसई बोर्डाने परीक्षेच्या तारखेबरोबरच निकालाचीही तारीख घोषित केली आहे; पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेबाबत कुठलीही घोषणा केली नाही.

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु परीक्षा कधी होणार, अभ्यासक्रम किती असणार, पेपर पॅटर्न कोणता असणार, तोंडी व लेखी गुणांचे प्रमाण काय असणार, अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे मूल्यमापन गुणदान किती व कसे असणार, परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन होणार, गुणदान तक्त्याचे नियोजन कसे असणार, हे प्रश्न आता भेडसावत आहेत.

आणखी अभ्यासक्रम कमी करणार आहे की नाही, परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावली की जुन्याच पद्धतीची प्रश्नपत्रिका राहणार, त्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण होणार किंवा नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात असल्याने संपूर्ण शिक्षणक्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाची स्थिती आहे.

राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी नागपूर विभागातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे या विषयाकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

- संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा संभ्रम दूर करून दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चित करून स्वयंस्पष्ट दिशा-निर्देश तत्काळ निर्गमित करावे. पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा.

- अनिल शिवणकर, शिक्षक

- दहा महिन्यांनंतर आता वर्ग ९ ते १२ च्या प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांंचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असला तरी शासनाकडून अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, परीक्षा पद्धती, मूल्यमापन याबाबतचे निश्चित धोरण नाही.

-दिलीप तडस, उपमुख्याध्यापक, विदर्भ बुनियादी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय