शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उत्साही मतदारांचा ‘मध्य’वेध

By admin | Updated: October 16, 2014 00:57 IST

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांचा येथे विशेष उत्साह पाहायला मिळाला.विशेषत: सकाळी पाऊस असतानादेखील मतदार मतदान

नागपूर : मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांचा येथे विशेष उत्साह पाहायला मिळाला.विशेषत: सकाळी पाऊस असतानादेखील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. संघाचा बालेकिल्ला आणि सर्वात जास्त मुस्लीम मतदार असलेल्या या क्षेत्रात प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. एकूणच ५७ टक्के मतदान झाले व उत्साही मतदारांनी मध्यच्या जागेचे ‘लक्ष्य’वेध केले.या मतदारसंघात वयोवृद्ध, अंध व अपंग मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार बजावला. पावसातदेखील ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून आला, हे विशेष. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी कुटुंबीयासह सकाळी १० वाजता महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉल कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. मध्य नागपूर मतदारसंघातील महाल, इतवारी, मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी या भागांमध्ये दिवसभर उत्साह दिसून आला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर अ़नेक मतदार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुस्लिमबहुल भागांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे महिला शेजारपाजारच्या नागरिकांनादेखील मतदानाचे आवाहन करताना दिसून आल्या. महिलांचा उत्साहपावसामुळे सुरुवातीला दोन तास मतदान संथ होते; सकाळी १० नंतर मध्य नागपुरातील बहुतांश केंद्रांवर चांगली गर्दी दिसून येत होती. अनेक केंद्रांवर ४ वाजेनंतर मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती. मोमीनपुरा व हंसापुरी भागातील मतदान केंद्रावर मतदानासाठी महिलांचा विशेष उत्साह दिसून येत होता. यात नवमतदारांसोबतच ज्येष्ठ महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.अरुंधतीचे ‘गेट,सेट,व्होट’सिरसपेठ येथील लोकांची शाळा येथील मतदान केंद्रावर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व जिल्हा निवडणूक आयोगाची ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर’ अरुंधती पानतावणे हिने कुटुंबीयांसोबत मतदान केले. मतदान हीच खरी राष्ट्रसेवा आहे. लोकशाही बळकट करण्याची ही संधी असते व योग्य जनप्रतिनिधी निवडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी व विशेषत: तरुण-तरुणींनी जास्तीतजास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन तिने यावेळी केले. विविध स्पर्धांमुळे नेहमी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असणाऱ्या अरुंधतीने यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला हे विशेष.कडेकोट बंदोबस्तशहरातील सर्वाधिक संवेदनशील मतदानकेंद्र असलेल्या मध्य नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोमीनपुरा परिसरातील मनपा मोमीनपुरा मुलांची उर्दू शाळा तसेच जवळपासच्या मतदानकेंद्रांवर चोख पोलीस व्यवस्था होती. पोलिसांचे गस्तीपथकही या भागात ठेवण्यात आले होते. याशिवाय साध्या वेषातील पोलिसदेखील येथे पाहणी करत होते.