सायकल रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST2021-01-22T04:08:30+5:302021-01-22T04:08:30+5:30

काेराडी : महादुला नगर पंचायतच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित महादुल्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...

Message of cleanliness from the bicycle rally | सायकल रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

सायकल रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

काेराडी : महादुला नगर पंचायतच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित महादुल्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून स्वच्छतेचा संदेश देत शहरात सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन केले.

काेराडी मंदिर टी-पाॅईंट येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून भ्रमण केल्यानंतर नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या उपस्थितीत रॅलीचा समाराेप झाला. यावेळी मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे, सभापती पंकज ढाेणे, नगरसेवक विजय राऊत, नगर पंचायत कर्मचारी मयूर धाेटे, माेनाली गायधने, अशाेक कुथे, अमाेल पखिड्डे, वसंत वैद्य, महादेव दिवाणे, बाल्या गवळी, कमलेश काेचे, राखी कडव, रवींद्र कुथे, चरणदास सातपुते, आशिष गुंडूकवार, गाैरव राऊत, विनोद लझडे, भूपेंद्र नांदूरकर, अक्षय डोंगरे, रितेश शिंदे, सीमा राजूके, लक्ष्मी महल्ले, मोहित मेश्राम, महेंद्र बावनथडे, प्रिन्स टेंभुर्णे, भूषण गावंडे, ढेकन चौधरी, पीयूष अंजनकर, अमोल वाठोरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Message of cleanliness from the bicycle rally