व्हॅलेन्टाईन दिनी व्यापाऱ्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:19+5:302021-02-15T04:09:19+5:30

नागपूर : व्हॅलेन्टाईन दिनी भारतमातेप्रति प्रेम व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. टीम कॅट नागपूरने भिलगांव येथे ...

Merchants on Valentine's Day | व्हॅलेन्टाईन दिनी व्यापाऱ्यांनी

व्हॅलेन्टाईन दिनी व्यापाऱ्यांनी

नागपूर : व्हॅलेन्टाईन दिनी भारतमातेप्रति प्रेम व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. टीम कॅट नागपूरने भिलगांव येथे या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, भारतावर पाश्चिमात्य संस्कृतीने आक्रमण केल्याने नुकसान झाले आहे. युवकांनी भारतीय संस्कृतीचा अवलंब करावा. संपूर्ण देशात व्हॅलेन्टाईन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात येतो. युवकांनी देशाची संस्कृती, परंपरा आणि सभ्यता ध्यानात ठेवून व्हॅलेन्टाईन दिन साजरा करावा. प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. सकारात्मक मार्गाचा अवलंब करावा. ही बाब ध्यानात ठेवून व्यापारी दरवर्षी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माध्यमातून व्हॅलेन्टाईन दिनी भारतमातेला प्रेम अर्पण करतात. टीम कॅट नागपूरतर्फे उपाध्यक्ष व महिला समिती अध्यक्ष ज्योती अवस्थी व दीपा पचोरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या प्रसंगी नागपूरचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, किशोर धाराशिवकर, राजकुमार गुप्ता, ज्ञानेश्वर रक्षक, विनोद गुप्ता, गोविंद पटेल, जयश्री गुप्ता, नीतू नायक, भिलगांचे सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Merchants on Valentine's Day