शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नागपुरात व्हिंटेज कार रॅलीने जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 10:08 IST

भारतीय सैन्याच्या उत्तर महाराष्ट्र अ‍ॅण्ड गुजरात एरिया (उमंग) मुख्यालयात रविवारी व्हिंटेज कारचे प्रदर्शन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देभारतीय सैन्याच्या ‘उमंग’चे आयोजनदृष्टिहिनांनी सांगितला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याच्या उत्तर महाराष्ट्र अ‍ॅण्ड गुजरात एरिया (उमंग) मुख्यालयात रविवारी व्हिंटेज कारचे प्रदर्शन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. संविधान चौकाजवळील मुख्यालयात सकाळी ११ वाजता न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवून कार रवाना केल्या. व्हिंटेज कार रॅलीने संडे कारप्रेमींसाठी अविस्मरणीय बनला.भारतीय सैन्याच्या परिसरात आलिशान कार पाहण्यासाठी कारप्रेमींनी गर्दी केली. या दरम्यान युनिट-४५२ च्या जॉर्ज बॅण्ड आणि पाईप बॅण्डच्या संगीताने लोकांना रिझविले. रविवार असल्यामुळे प्रदर्शनात लोक कुटुंबीयांसह पोहोचले आणि रॉयल कारसोबत फोटो काढले. १०० वर्षें वा त्यापेक्षा जुन्या कारपर्यंत पोहोचून लोकांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी काही वेळ उन्ह निघाल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण झाले. अशा वातावरणात व्हिंटेज रॅलीला सुरुवात झाली. कॅड्रिलेन लिमोजिन, फोर्ड, आॅस्टीन, बीटल यासारख्या जुन्या कार रस्त्यावर धावल्या.

दृष्टिहीन बनले मार्गदर्शकरॅलीमध्ये दृष्टिहीनांनी बे्रल लिपीतील संकेत वाचून कार चालविणाऱ्याला रस्ता दाखविला. ही व्हिंटेज कार रॅलीची विशेषत: होती. प्रत्येक कारमध्ये बसलेल्या या मार्गदर्शकांनी अत्यंत योग्यरीत्या रस्ता सांगितला. प्रकाश कमी असतानाही आम्ही अन्यपेक्षा कमी नाहीत, असे संकेत त्यांनी दिले. रॅलीमध्ये मार्ग दाखविणाऱ्या दक्षिण अंबाझरी येथील ब्लार्इंड बॉईज इन्स्टिट्यूटच्या २७ मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

२० कि़मी.चा प्रवाससर्व आलिशान गाड्या संविधान चौक, रहाटे कॉलनी चौक, दीक्षाभूमी, एनआयटी गेट, रामनगर, रविनगर, फुटाळा, वायुसेनानगर, टीव्ही टॉवर, गोंडवाना चौक, धरमपेठ, लॉ कॉलेज चौक मार्गे जवळपास २० कि़मी.चा प्रवास करीत पुन्हा सैन्याच्या मुख्यालयात पोहोचल्या.

दुचाकी गाड्यांचे आकर्षणप्रदर्शन आणि रॅलीत जुन्या बाईक व स्कूटर लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. यामध्ये शिवाजीनगर येथील राजेश गुप्ता यांच्या हार्ले डेव्हिड्सने (१९२२) लोकांना आकर्षित केले. याशिवाय सायकलसारखी बाईक, इक्बाल अहमद यांची नॉर्टन (१९३९) आणि मॅचलेस बाईकचे (१९४४) आकर्षण होते. रॅलीदरम्यान एक जुनी बुलेट बंद पडली. जुन्या गाड्यांचे शौकीन मेकॅनिकल चौधरी यांनी चालकाला गाडी मेन स्टॅण्डवर उभी करण्याचा आग्रह केला. त्यानंतर इंजिनच्या बाजूला त्यांनी काही सेकंदात सेटिंग करताच गाडी सुरू झाली. प्रदर्शनात लॅम्ब्रेटा, राजदूत, ३५० सीसी यामाहा, यज्दी यासारख्या गाड्या होत्या.

या कारने दाखविला ‘जलवा’रॅलीची सुरुवात जगात सर्वात छोटे स्टीम इंजिन बनविणारे इक्बाल अहमद यांच्या द्वितीय महायुद्धात उपयोगात आलेल्या फोर्ड जीपसह झाली. त्यांची अन्य जीप अकील अहमद आणि आरिफ इकबाल यांनी चालविली. याशिवाय शाहिद लतीफ यांची गाडी आकर्षक होती. त्यानंतर डॉ. रवींद्र सावरबांधे यांची फोर्ड (१९४४), आनंद परचुरे व अरविंद गोरले यांची विलीज कार धावली. सरदार जगतार सेठी यांची ओल्ड मॉडेल जीप तिरंगा झेंड्यासह रवाना झाली. रुद्राक्ष भगवाघरची बीटल हळूवार सैन्याच्या परिसरातून पुढे गेली. त्यानंतर शेख रसूल यांनी फोर्ड व्ही-८ ला रॉयल अंदाजात पुढे नेले. या कारच्या मागे राजेश गुप्ता यांची आॅस्टीन, आशीष लिंबन्ना यांची शेव्हरलेची फ्लीटमास्टर, अकील अहमद यांची आॅस्टीन रॅलीत पुढे गेली. अरुण उपाध्याय यांची बेंटली (१९४६), संकेत नागपूरची हिंदुस्तान-१४, श्रणोत ममरोतवार-मर्सिडीज डब्ल्यू-११०, गौरव गोडसे-मॉरिस आॅक्सफोर्ड, राम घोडगरे-निसान, किरण बोबडे यांनी हिंदुस्तान-४० कार चालविली. त्यानंतर १९३२ मॉडेलची शाहरुख काजी यांच्या कॉर्डिलेकने रॅलीत रंगत आणली. याशिवाय अन्य मर्सिडीस व अ‍ॅम्बेसडर कार रॅलीत धावल्या.

टॅग्स :carकार