लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक युवकांना कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एमआयडीसी स्कील डेव्हलपमेंट सेंटर यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदवीसोबतच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मीनल क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे तर एमआयडीसी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य कराराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आता अनिवार्य इंटर्नशिप प्रत्यक्ष कौशल्य विकास केंद्रात पूर्ण करता येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ‘अकॅडमिक क्रेडिट्स’ही मिळणार असल्याने शिक्षणासोबत प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या बाजारपेठेत विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र हे एज्युस्पार्क या कंपनीच्या माध्यमातून चालविले जाते. येथे प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण दिले जाते. केंद्रात लॉजिस्टिक, सीएनसी प्रोग्रामिंग, एआय-बिझनेस इंटेलिजन्स, मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट, अकाउंटिंग, जीएसटी, टॅली तसेच रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्राशी संबंधित एकूण ११ अभ्यासक्रम चालविले जातात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्राचे प्लेसमेंट सेल कार्यरत राहणार आहे.
Web Summary : Nagpur University and MIDC Skill Development Center signed an agreement to provide skill-based education and employment to local youth. Students will get industrial training, internships, and job opportunities, enhancing their competitiveness in the job market through practical training.
Web Summary : नागपुर विश्वविद्यालय और एमआईडीसी कौशल विकास केंद्र ने स्थानीय युवाओं को कौशल-आधारित शिक्षा और रोजगार प्रदान करने के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए। छात्रों को औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप और नौकरी के अवसर मिलेंगे, जिससे नौकरी बाजार में उनकी प्रतिस्पर्धात्मकता बढ़ेगी।