मेडिकल स्टाेअर्समधील औषधे, साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:29+5:302021-07-14T04:11:29+5:30

माैदा : मेडिकल स्टाेअर्समध्ये प्रवेश करून आतील औषधे व संगणक संच चाेरून नेला. या साहित्याची एकूण किंमत २६ हजार ...

Medicines, materials in medical stores were seized | मेडिकल स्टाेअर्समधील औषधे, साहित्य पळविले

मेडिकल स्टाेअर्समधील औषधे, साहित्य पळविले

माैदा : मेडिकल स्टाेअर्समध्ये प्रवेश करून आतील औषधे व संगणक संच चाेरून नेला. या साहित्याची एकूण किंमत २६ हजार रुपये आहे. ही घटना माैदा शहरात शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडली.

शंकर दिवाळू सुपारे (२७, रा. माैदा) यांचे रामटेक राेड, साईनगर, माैदा येथे मेडिकल स्टाेअर्स आहे. शुक्रवारी मध्यरात्री दुकानाच्या परिसरात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने शटरची पट्टी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने दुकानातील २० हजार रुपये किमतीची विविध औषधे, तीन हजार रुपयांचा डीव्हीआर आणि तीन हजार रुपयांचा सीपीयू असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. दुकानात चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.

Web Title: Medicines, materials in medical stores were seized