शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: April 4, 2017 23:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) व्यवसायोपचार विभागातील (आॅक्युपेश्नल थेरपी) द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने मंगळवारी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 04 -  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) व्यवसायोपचार विभागातील (आॅक्युपेश्नल थेरपी) द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. वसतिगृह क्र. ६च्या खोलीत घडलेल्या या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.  करीश्मा राऊत (२१) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, करीश्मा राऊत मनमिळावू विद्यार्थिनी होती. अभ्यासातही हुशार होती. घटनेच्या दिवशी मंगळवारी ती आपल्या मैत्रीणीसोबत सामान्यपणे होती. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ती आपल्या खोलीत असताना मैत्रणीला दूध आणण्यास पाठविले. ही विद्यार्थिनी जेव्हा दूध घेऊन परत आली, तेव्हा खोलीचे दार आतून बंद होते. तिने आजू-बाजूच्या मैत्रणीला बोलवून घेतले, काही झाल्याची शंका आल्यावर तिने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दार तोडले. खोलीच्या आत प्रवेश घेताच करीश्मा खाली पडलेली होती. तिच्या गळ्यात तुटलेली रस्सी होती. तिला लागलिच मेडिकलच्या अपघात विभागात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली. करिश्माला मिरगीचा आजार होता. या आजारपणामुळे तिने आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच  अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी महाविद्यालय गाठले. अजनी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. करीश्माला वडील नाहीत. आई, मोठा भाऊ व बहीण आहे. त्यांना याची माहिती देण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, १४ आॅगस्ट २०१६ रोजी मेडिकलच्याच वसतिगृह क्र. ५ च्या ४६ क्रमांकाच्या खोलीत फिजीओथेरपीच्या प्रथम वर्षाचा माजी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.