शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या कर्मचाऱ्याला मारहाण : रुग्णालयाचा परिसर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:47 IST

शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या एका इन्टर्नला मारहाण करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मेडिकलचे स्वच्छता निरीक्षक नरसिंग देवरवाड हे मेडिकल परिसरातील ‘ओटी जी’च्या मागील भागातील क्वॉर्टरमध्ये राहतात. याच भागात थोडे पुढे बांधकाम विभागाने मजुरांना राहण्यासाठी तात्पुरत्या झोपड्या बांधून दिल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजता नरसिंग मोबाईलवर बोलत घरासमोरील रस्त्यावरून जात असताना झोपड्यांमधून जोरजोराने आवाज येत असल्याने ते त्या दिशेने गेले. झोपडीत बांधकाम विभागाचे दोन कामगार व मेडिकलमधील कक्ष परिसर पदावर काम करणारा रॉबिन विपीन फिलिप्स हे तिघेरी दारू पित होते. घराजवळ हा प्रकार सुरू असताना नरसिंग यांनी जाब विचारला. परंतु उलट तिघेही शिव्या देऊ लागले. दारुच्या नशेत असलेल्या फिलिप्सने जवळची वीट उचलून मारली. यामुळे नरसिंगचा डाव्या डोळ्याजवळील कपाळावर आणि उजव्या हाताच्या बोटाला किरकोळ जखम झाली. त्यांनी ढकलून दिल्याने पाठीला जबर मार बसला, नंतर ते पळून गेले. या घटनेची नरसिंग यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरक्षा रक्षक मोबाईलवर!एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितले, मेडिकलचा मोठा पैसा सुरक्षा रक्षकांवर खर्च होतो. परंतु त्या तुलनेत हवी तशी सुरक्षा नाही. अनेक सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना मोबाईलवर बोलत असतात. यामुळे संशयित व्यक्तीवर त्यांची नजर पडत नाही. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोर मोठ्या प्रमाणात अ‍ॅम्ब्युलन्स, ऑटोरिक्षा, ई-रिक्षाचे अवैध स्टॅण्ड झाले आहे. यातून गुन्हेगारी फोफावत आहे. त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयEmployeeकर्मचारी