शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर !

By admin | Updated: June 10, 2015 02:54 IST

महापालिकेच्या शाळेत शिकणारा डिप्टी सिग्नलसारख्या भागात राहणारा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात १०० पैकी १०० गुण मिळवू शकतो, ...

मनपाच्या शाळेत घेतात अतिरिक्त वर्ग : विद्यार्थ्याला मिळाले गणितात १०० गुणनागपूर : महापालिकेच्या शाळेत शिकणारा डिप्टी सिग्नलसारख्या भागात राहणारा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात १०० पैकी १०० गुण मिळवू शकतो, यावर खरं तर विश्वासच बसत नाही. पण संजयनगर हिंदी प्राथमिक शाळेत शिकणारा कमल विसराम साहू या विद्यार्थ्याने गणितात १०० गुण मिळविले. कदाचित महापालिकेच्या शाळेत हा नवा विक्रम आहे. कमलने त्यासाठी परिश्रम घेतलेच, पण त्याचे गणित शिक्षक विलास बल्लमवार यांनीही तेवढेच परिश्रम घेतले आहेत. गरीब पण गुणवंत असलेल्या, गणिताची ट्युशन लावू न शकणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यांचे गणित जुळविण्यात बल्लमवार सरांचा मोठा वाटा आहे. विलास बल्लमवार...! अत्यंत साधी राहणी असलेले गणित शिक्षक. महापालिकेच्या डिप्टी सिग्नल येथील संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून शिकवितात. या शिक्षकाच्या कर्तव्यनिष्ठेला सलामच करायला हवा. महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब घरचे असतात. घरात खायला कसेबसे मिळते. त्यामुळे गणिताची ट्युशन लावण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, दहावीत गुण कमी पडले तर पुढील आयुष्य अंधारमय होण्याची भीती असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांसाठी बल्लमवार सर स्वत: अधिक कष्ट घेतात. दररोज सकाळी ११.४५ वाजता शाळा सुरू होते. शाळेच्या पाऊण तासापूर्वी ते गणिताचा अतिरिक्त वर्ग घेतात. आई-वडील कामाला गेल्यामुळे, रेशन दुकानात गेल्यामुळे, रॉकेलसाठी रांगेत उभे राहावे लागल्यामुळे किंवा घरातील अशाच काही कामांमुळे काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्गाला येणे शक्य होत नाही. त्यांनाही ते समजून घेतात. तुला जमेल तेव्हा ये, पण नक्की ये, असा प्रेमळ आग्रह ते विद्यार्थ्यांकडे धरतात. या आपुलकीमुळे विद्यार्थीही वर्गाला येण्याचा प्रयत्न करतात. खरं तर दहावीची तयारी नववीच्या निकालानंतरच सुरू होते. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की ते शाळेत २० दिवस एक्स्ट्रा क्लासेस घेतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी करतात. लोकमतकडून गौरव!विद्यार्थ्यांना शिकविण्याची बल्लमवार यांच्यामध्ये असलेली तळमळ ‘लोकमत’च्या निदर्शनास आली. कुठल्याही शाबासकीची अपेक्षा नसलेल्या या शिक्षकाला लोकमतने सन्मानाचे निमंत्रण दिले व कार्यालयात सत्कार करून विद्यार्थी व पालकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.