शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

युवा नेक्स्ट सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

By admin | Published: November 24, 2014 1:18 AM

बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून

नागपूर : बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून लोकमत भवनाच्यासमोर युवकांची रांग लागली होती. हजारो महाविद्यालयीन युवक-युवती ‘युवा नेक्स्ट’चे सदस्य झाले. ‘लोकमत युवा नेक्स्ट-२०१४-१५’च्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, गायकवाड पाटील कॉलेजचे संचालक मोहन गायकवाड, जेयल चतुर्वेदी कॉलेजचे प्राचार्य अभय शेंडे, झुलेलाल कॉलेजचे उपप्राचार्य देबाशिश भौमिक, स्नेहा कोचिंग क्लासेसचे श्याम शेंद्रे व रजनीकांत बोंद्रे, नुतन भारत विद्यालयाचे संचालक रमेश बक्षी, सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे, मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मधुसूदन मुडे उपस्थित होते. लोकमत नागपूर युनिटचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे व श्रीनिधी घटाटे, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगामध्ये सुवर्णपदक मिळविणारी धनश्री लेकुरवाळे, आर.जे. राजन, नागपुरातील एकमेव ‘एफ वन कार रेसर’ अंशुल शाहा आदींनी वेंगसकर यांच्याकडून मानाची सदस्यता घेतली. उपस्थित मान्यवरांनी, युवकांनी या व्यासपीठाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकास, सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात सहभाग होण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहन करीत युवा नेक्स्टच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल्या या नोंदणीला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)