शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोटाळीत घडून आले ‘मनोमिलन’

By admin | Updated: May 7, 2017 02:09 IST

सातत्याने तीन वर्षांपासून लहानसहान कारणांवरून वादविवाद, भांडण आणि संघर्ष होणाऱ्या भिवापूर तालुक्यातील

अभय लांजेवार। लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : सातत्याने तीन वर्षांपासून लहानसहान कारणांवरून वादविवाद, भांडण आणि संघर्ष होणाऱ्या भिवापूर तालुक्यातील गोटाळी (मालेवाडा) येथे अखेरीस ‘मनोमिलन’ घडून आले. दोन्ही गटांनी उपस्थितांसमोर आपापल्या चुकांची कबुली देत एकमेकांना पेढ्यांचा घास भरवत या संघर्षाचा शेवट गोड केला. यामुळे क्षणभर वातावरण भावूक झाले होते. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उपोषण मंडपातच सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे विचार यावेळी अनेकांनी मांडले. दोन्ही गटाचे मनोमिलन घडविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला, हे विशेष! आपण सारे एक आहोत. संघटित आहोत, या भावनेतून नव्या जोमाने कामाला लागू, असा निर्धारही दोन्ही गटातून अभिव्यक्त झाला. आता आम्हास कुणीही भडकवू शकत नाही. वेगळे करू शकत नाही, असाही सूर चर्चेअंती दिसून आला. या निर्णयामुळे केवळ ‘बदनामी’चे कंगोरे बांधणाऱ्यांना जबरदस्त चपराक मिळाल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे. विशेषत: लोकमतच्या वृत्तानंतर भारतीय बौद्ध महासभा, एम्बस आॅर्गनायझर, युवा नेते राजू पारवे आणि काही सामाजिक जाणिवांची जपणूक करणाऱ्या व्यक्तींनी या सत्कार्यासाठी पुढाकार घेतला. प्रशासकीय यंत्रणेनेही उत्तम सहकार्य दिले. राजू पारवे यांनी शुक्रवारी दुपारीच गोटाळी गाव जवळ केले. दोन्ही गटातील सदस्यांशी संवाद साधला. ‘समोर एक आणि पडद्याआड दुसरेच’अशी समाजविघातक खेळी न खेळता सुमारे दोन तास गोटाळी येथे अनेकांकडे प्रत्यक्ष भेट दिली. चला सकारात्मक मार्ग काढू या, अशी हाक दिली. सायंकाळच्या सुमारास चर्चा सुरू झाली. भारतीय बौद्ध महासभेनेही पुढाकार घेत दोन्ही गटांना समजाविण्याचाच पवित्रा घेतला. आता भांडायचेच झाले तर विकास कामांसाठी भांडू, अशाही प्रतिक्रिया या बैठकीत व्यक्त झाल्या. दोन्ही गटांनी आपापल्या चुकांची कबुली देत सकारात्मक भावनेतून आमच्यातील कटुता संपली, असे जाहीर करीत या प्रकरणाला पूर्णविराम दिला. लागलीच याच बैठकीत एकत्रितपणे बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. बैठकीतील उपस्थिती मुलांकडे लक्ष द्या. विधायक कामांना प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी यावेळी केले. चर्चेत भारतीय बौद्ध महासभेचे सुखदेव गायकवाड, चंद्रमणी पिल्लेवान, एम्बस्चे डॉ. पारस शंभरकर, डॉ. सी. जी. पाटील तसेच अ‍ॅड. प्रबुद्ध सुखदेवे, मुकेश गायगवळी, परसराम पिल्लेवान, इंद्रपाल गजघाटे, नारायण इंगोले, बाळू इंगोले, केशव ब्रम्हे, उमेश तिमांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, तहसीलदार डी. जी. जाधव, ठाणेदार रवींद्र दुबे, राजू पारवे, विलास झोडापे आदींसह गावकरीही उपस्थित होते. ‘लोकमत’ने जोपासली सामाजिक बांधिलकी एका वेगळ्या आणि नवीन विषयाला ‘लोकमत’ने हात घातला. ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचे मत राजू पारवे, विलास झोडापे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सोबतच बेधडकपणे ‘लोकमत’ने वास्तव मांडत दोन्ही गटांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे आणि शुभवर्तमानाची सामाजिक जबाबदारीही जोपासल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’च हे घडवून आणू शकते, अशा शब्दातही त्यांनी कौतुक केले.