शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ’ बनावी!

By admin | Updated: February 23, 2015 02:38 IST

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जीवन सुरक्षा प्रकल्पातर्फे दिवंगत मोहन जावडेकर स्मृती विदर्भस्तरीय ‘रस्ते अपघात रक्षक पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आयटी पार्क मार्गावरील कविकुलगुरू कालिदास सभागृहात पार पडलेल्या या समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर उदयभास्कर नायर, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह, पुरस्कार समारंभ समितीचे अध्यक्ष नगरसेवक संदीप जोशी, प्रा. राजा आकाश, समीर बेंद्रे, रूपाली जावडेकर, शरद जिचकार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी कार्यक्रम घेतो, जनजागरणाचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न नियमित व्हावेत; कारण अपघातात जीव एखाद्याचा जातो. मात्र, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबीयांना सहन करावे लागतात. त्यामुळे सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी. अपघात झाल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आम्ही अपघातच होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे. देशात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांनी अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज विशद केली. नागपूरला अपघातमुक्त शहर वनविण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवन सुरक्षा प्रकल्प तसेच परसिस्टंटचे जे कार्य आहे त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, नगरसेवक जोशी यांनी प्रस्तावना केली. अध्यक्ष राजू वाघ यांनी प्रकल्पाचा उद्देश विशद केला. आम्ही आतापर्यंत २०० लोकांचे प्राण वाचविले आणि १५०० अपघातग्रस्तांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अशाप्रकारे कार्य करणारी एकमात्र संघटना असल्याचेही ते म्हणाले. जीवन सुरक्षा प्रकल्पाने तयार केलेल्या संकेतस्थळाचेही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. अपघाताची संबंधित यंत्रणांना माहिती देऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन मंदार धर्माधिकारी यांनी केले. परसिस्टंटच्या युवक-युवतींनी अपघात कसे टाळता येईल, त्याचा संदेश देण्यासाठी एक पथनाट्यही सादर केले. या कार्यक्रमात विदर्भात ठिकठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रक्षकांनाही यावेळी मोमेन्टो देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणाच्या समारंभापूर्वी डॉ. संजय दाचेवार यांनी अपघातग्रस्तांना कशी मदत करायची, याविषयी माहिती दिली. (प्रतिनिधी)लोकमतच्या राजेश टिकले यांना उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार जीवन सुरक्षातर्फे उत्कृष्ट छायाचित्रासाठी प्रदान करण्यात आलेला पुरस्कार लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार राजेश टिकले यांनी मिळवला. जोखीम पत्करून अपघातग्रस्तांना मदत करणारे शौर्य पुरस्कार राजेंद्र वानखेडे, अमन बोरे आणि विनोद गजभिये यांना प्रदान करण्यात आले. वृत्त संकलनासाठी पत्रकार अनिल फेकरीकर यांना तर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शरद बागडी आणि वाहतूक शाखा एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी संदीप बोरकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.