शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र किसान सभा १०० गावांमध्ये गावपंचायती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांबद्दल जनजागरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नागपूर जिल्हांतर्गत येणाऱ्या किमान १०० ...

नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांबद्दल जनजागरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नागपूर जिल्हांतर्गत येणाऱ्या किमान १०० गावात गावपंचायत आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करा व शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा, वीज बिल २०२१ रद्द करा, या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर २६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज १०० दिवस पूर्ण होऊनही केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने हे आंदोलन दीर्घकाळ चालविण्याची मानसिकता आंदोलकांनी केली आहे. म.रा. किसान सभाद्वारे राज्यात हे आंदोलन विस्तारित करण्याकरिता राज्यात मार्च महिन्यात किमान दोन हजार गावांमध्ये गावपंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात १०० गावात गावपंचायतीचे आयोजन करण्यात येत आहे. ८ मार्चला रामटेक तालुक्यातील लोधा, करव ई , वडाम्बा रयतवाडी या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या १४ गावांची तर ९ मार्चला पारशिवनी तालुक्यातील सुवरदरा, नरहर, कोलीतमारा या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या १६ गावांची व १३ मार्च रोजी नागपूर ग्रामीण तालुक्यातील सोनेगाव, मागली, दुधा ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ८ गावांची मिळून गावपचांयती घेण्यात येत आहे. या गावपंचायतींच्या अध्यक्षस्थानी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच राहतील. तर शेतकरी कायद्याविषयी माहिती किसान सभेचे जिल्हा सचिव अरुण वनकर व आदिवासी महासभेचे नेते नत्थू परतेती, दुर्योधन मसराम देतील. नंतर ठराव मांडून त्यावर मतदान घेऊन त्याचा अहवाल केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाला पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा सचिव अरुण वनकर यांनी दिली आहे.