शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:11 IST

Maharashtra Election 2019:किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

नागपूर : शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सावटाखाली झालेल्या मतदानाला मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.

सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या.धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे तेथील मतदान केंद्रात शुकशुकाट होता. रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांकडे कोणी लक्षच देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

राळेगावात पहिल्या लोकसभा निवडणूक साक्षीदाराचे मतदान

भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीचे साक्षीदार ठरलेले १०३ वर्षीय पुखराज उमीचंद बोथरा यांनी सोमवारी राळेगाव (जि. यवतमाळ)येथे मतदान केले. निवडणूक विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष वाहनाद्वारे केंद्रावर दाखल होऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVotingमतदान