शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांची संपत्ती सव्वा चार कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 21:02 IST

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे.

ठळक मुद्देशपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांची नोंद : स्वत:ची एकच कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढली आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे अचल संपत्तीत वाढ झाली आहे.२०१४ साली मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या २३ लाख ३ हजार ६३० रुपयांची चल संपत्ती व १ कोटी ८१ लाख १० हजार ५०० रुपयांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा २ कोटी ४ लाख १४ हजार १३० इतका होता. २०१९ मध्ये हा आकडा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ वर पोहोचला आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत २ कोटी २० लाख ९ हजार ५०४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल तर ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर २०१४ साली २ कोटी ३० लाख ७१ हजार २०६ रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ७४१ इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत ९०.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्याही वेतनात पाच वर्षांत झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. त्यांच्या नावावर ३ कोटी ३९ लाख ५८ हजार ७४१ रुपयांची चल तर ९९ लाख ३९ हजारांची अचल संपत्ती आहे.अशी आहे मुख्यमंत्र्यांची संपत्तीरोख रक्कम रु.१७,५००ठेवी रु.८,२९,६६६इन्शुरन्स पॉलिसी रु.१४,००,३१९चारचाकी वाहन (महिंद्र एक्सयूव्ही) रु.६,००,०००मोटारसायकल रु.७,०००सोने रु.१७,४०,१५०जमीन (४.९६६ एकर) रु.५८,४०,०००घर रु.३,१९,८९,०००प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या चार खासगी तक्रारीमुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात चार खासगी तक्रारींच्या प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा (एफआयआर) दाखल नाही. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खासगी तक्रारींपैकी तीन तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे. सतीश उके यांनी ज्या तीन खासगी तक्रारी केल्या आहेत, त्यापैकी पहिले प्रकरण हे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ‘रेफर बॅक’ झालेले आहे. हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (अ) अन्वये आहे. दुसरे प्रकरण हेसुद्धा कलम लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२५ (अ) अन्वये असून ती तक्रार उच्च न्यायालयापुढे आहे व यात आरोपनिश्चिती झालेली नाही. सतीश उके यांची तिसरी तक्रारसुद्धा याच कारणासाठी असून, ती नागपूर येथील तदर्थ न्यायालयापुढे असून यातदेखील आरोपनिश्चिती झालेली नाही. चौथी तक्रार मोहनीश जबलपुरे यांनी पोलिसांचे खाते अ‍ॅक्सिस बँकेत उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पदाचा गैरवापर केल्यासंदर्भात आहे. प्रत्यक्षात २००५ पासूनच पोलिसांची बँकखाती ही या बँकेत असल्याचा खुलासा गृहविभागाने यापूर्वीच केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयापुढे असून मुख्यमंत्र्यांना यात न्यायालयाने नोटीस बजावलेली नाही. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम