शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:52 IST

भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देचंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिणमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ मंगळवारी चंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, रमेश पिसे, अरुण गाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर म्हणाले, देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की, सरकारला रिझर्व्ह बँकेकडून पैसे घ्यावे लागत आहे. देशाला हजारो-लाखो कोटी रुपयांचा नफा कमवून देणाऱ्या नवरत्न कंपन्या विकायल्या काढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अंबानीच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर परिवर्तन करावे लागेल. महाराष्ट्राचीही पत घसरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आज तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर गेले आहे. राज्यावर पाच लाख कोटीचे कर्ज आहे. दोन कोटी रोजगार हिरावल्या गेले आहेत. लोकांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजप बहुमताने निवडून येण्याचा दावा मुख्यमंत्री करतात. त्यांना विजयाची इतकीच खात्री आहे तर मग प्रचारासाठी पंतप्रधानांपासून सर्व मंत्री आणि देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना का बोलवावे लागत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम