शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केली आहे : असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:12 IST

गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.

ठळक मुद्देकाँग्रेसवरही केला प्रहार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : या देशाला बाबासाहेबांनी संविधान देऊन प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क दिला. पण गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.एमआयएमआयएमचे मध्य व उत्तर नागपूर विधानसभेचे उमेदवाराच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही ताशेरे ओढले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसच्या दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, मॉब लिंचिंगमध्ये ज्यांची हत्या झाली त्या हत्यारांचा सन्मान करण्यात आला.काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले की, काँग्रेस पार्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. निवडणुका आल्या की काँग्रेस पक्षाला जनतेच्या समस्या दिसतात. निवडणुका संपल्या की, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आज काँग्रेस विरोधक म्हणूनही उभी राहू शकत नाही. त्यामुळे जनतेने आता काँग्रेसच्या हातात हात देऊ नये, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी एआयएमआयएमचे विदर्भ युथ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला, नागपूरचे जिल्हा प्रभारी निसार सिद्दीकी, नागपूर शहर अध्यक्ष जावेद अख्तर, युथ अध्यक्ष बकारुद्दीन अन्सारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीnagpur-central-acनागपूर मध्य