शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये अत्यल्प वेतन

By admin | Updated: July 5, 2014 02:11 IST

राज्यातील खासगी आणि विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना अत्यल्प वेतन दिले जात असल्याबद्दल..

नागपूर : राज्यातील खासगी आणि विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना अत्यल्प वेतन दिले जात असल्याबद्दल अशा शिक्षण संस्थांचे कान टोचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतनश्रेणी पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. अशा शाळांना शासन अनुदान देत नाही. तरीही या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनश्रेणीची पुनर्रचना करण्याचे काम राज्य शासनाने येत्या चार महिन्यांत करावे, असे निर्देश न्या. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व पुखराज बोरा यांनी दिले. भरमसाठ शुल्क आकारणी करणाऱ्या या शाळा शिक्षकांना नाममात्र वेतनावर राबवितात. या विरुद्ध बुलडाणा येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलच्या महादेव मोरे व इतर २२ शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (एमईपीएस) कायद्याच्या अनुसूची ‘सी’प्रमाणे वेतन देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी शिक्षण संचालक व उपसंचालकांना पत्र लिहिले होते, पण त्यांनी काहीच कारवाई केली नव्हती. यानंतर शाळा व्यवस्थापनाला पत्र लिहिले असता त्यांनी दर पाच वर्षांनी प्राथमिक शिक्षकांचे ५००, तर उच्च माध्यमिक शिक्षकांचे १००० रुपये वेतन वाढविण्याची तयारी दर्शविली होती. यावर समाधान झाले नसल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.शाळा व्यवस्थापनाने प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते. सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल खासगी विनाअनुदानित अल्पसंख्यंक दर्जा असलेली शाळा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने ‘टी. एम. ए. पाई फाऊंडेशन वि. कर्नाटक शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार या शाळेला वेतनश्रेणी लागू होत नाही. डिसेंबर-२०१३ पासून २८ कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविले आहे. या कर्मचाऱ्यांना १३ हजार १३४ ते ५५०० रुपयांदरम्यान वेतन देण्यात येत आहे, असे शाळेचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित देव व अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)