शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:08 IST

आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजनमंच जनसंवादमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भात आधीच विविध औष्णिक प्रकल्पातून १७,००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. लोकांची गरज व मागणी नसताना १३२० मेगावॅटचा आणखी एक विद्युत प्रकल्प कोराडी येथे सुरू करण्यात येत आहे. जळणाऱ्या कोळशामुळे अत्यंत धोकादायक सल्फरडाय ऑक्साईड आणि रेडिओअ‍ॅक्टीव्ह कणांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.जनमंचतर्फे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी बाबुराव धनवटे सभागृहात कोराडीचा प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार काय, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालीवाल आणि महाविदर्भ जनजागरण समितीचे संयोजक नितीन रोंघे यांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत दिले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. पालीवाल म्हणाले, जगात कुठेही नसतील एवढे वीज प्रकल्प नागपूरच्या आसपास आहेत. १० वर्षांपूर्वी हरित लवादाने प्रदूषण नियंत्रणासाठी सिस्टीम लावण्याचे निर्देश देऊनही कोराडीत ते बसविण्यात आले नाही. यामुळे अनेक आजार आणि मृत्यू ओढविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन रोंघे यांनीही प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. प्रास्ताविक राजीव जगताप यांनी तर संचालन अ‍ॅड. मनोहर रडके यांनी केले.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर