शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीने चालविली लूट

By admin | Updated: June 12, 2015 02:44 IST

महापालिका एकीकडे कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंड ठोठावते तर दुसरीकडे प्रकल्पांसाठी नेमलेल्या सल्लागारांना

पेंच टप्पा चारच्या सल्लागाराला पुन्हा मुदतवाढ : बसच्या डीपीआरसाठी सल्लागारावर बंधने नाहीत नागपूर : महापालिका एकीकडे कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंड ठोठावते तर दुसरीकडे प्रकल्पांसाठी नेमलेल्या सल्लागारांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. हे सल्लागार स्थायी समितीला असा कोणता ‘सल्ला’ देतात की त्यांच्यावर मुदत संपूनही दंड ठोठावला जात नाही, उलट पैशाची उधळण केली जाते. पेंच टप्पा ४च्या सल्लागाराला आतापर्यंत दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तब्बल १५ कोटी ८६ लाख रुपयेही देण्यात आले आहेत. गुरुवारी स्थायी समितीने पुन्हा एकदा या सल्लागारावर कृपा दाखवीत तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली व ८८ लाख ७५ हजार रुपये देण्यास मंजुरी दिली. तर पर्यावरणपूरक नव्या बस खरेदीसाठी डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला. मात्र, हा डीपीआर कालावधीत तयार न केल्यास सल्लागारावर कुठली कारवाई केली जाईल, अशी कुठलीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना राबविण्यात आली. पेंच टप्पा १,२,३,४ असे प्रकल्प राबविण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी डीआरए-एसटीसी प्रा. लिमिटेड या सल्लागार कंपनीला २०११मध्ये कायार्देश देण्यात आले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत ठरलेली कामे पूर्ण करण्यात या सल्लागाराला यश आले नाही. नुकतेच लोकार्पण झालेल्या पेंच टप्पा चारमधील जलकुंभ, फिडर, जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप शिल्लक असून या कामासाठी डीआरए-एसटीसी प्रा. लिमिटेडला आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देऊन ८८ लाख ७५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव पेंच प्रकल्प विभागाने स्थायी समितीकडे पाठविला होता. या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. संबंधित कंपनीला या पूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे १५ कोटी ८६ लाख रुपयेही देण्यात आले आहे. असे असतानाही पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ का दिली जात आहे, असा साधा प्रश्नही स्थायी समिती अध्यक्षाने प्रशासनाला विचारलेला नाही. महापालिकेच्या तिजोरीचा ताळमेळ साधण्याची जबाबदारी स्थायी समितीची आहे. एकीकडे पैसा नाही म्हणून ओरड केली जाते तर दुसरीकडे सल्लागारांना वारंवार मुदतवाढ देऊन पैशाची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)सिंगारे म्हणतात, काम माझ्या कार्यकाळातील नाही४पेंच टप्पा ४ च्या सल्लागाराला दोनदा मुदतवाढ देऊन १५.८६ कोटी रुपये देण्यात आले. आता पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे, हे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला असता स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी ‘ते काम माझ्या कारकीदीर्तील नाही. त्यामुळे ते कुणाला दिले, कितीमध्ये दिले मला माहीत नाही’, असे नमूद केले. ‘सल्लागाराला दोनदा मुदतवाढ देऊन पैसे दिले, त्याबाबत मला माहिती नाही. कार्यालयाने आता माझ्याकडे प्रस्ताव पाठविला. त्यामुळे ती कामे करून घेण्याची जबाबदारीही कार्यालयाची आहे’, असे स्पष्ट करीत पैशाचा हिशेब घेण्याची जबाबदारीही पत्रकारांना उत्तरे देताना त्यांनी फेटाळून लावली. बसच्या डीपीआरसाठी सल्लागाराला ४४ लाख देणार ४ शहर प्रवासी वाहतुकीसाठी महापालिका पर्यावरणपूरक बस खरेदी करणार आहे. या बसचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी मे. दिनेश राठी अ‍ॅण्ड असोसिएट कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. सल्लागार कंपनीला या कामासाठी ४४ लाख ७० हजार रुपये देण्यात येतील. मात्र, सल्लागार कंपनीने संबंधित डीपीआर वेळेत तयार केला नाही तर त्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. तशी कुठलीही अट टाकण्यात आलेली नाही. वाहतूक अभियंता सोनकुसरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्यापुढे ही बाब स्पष्ट केली. विशेष म्हणजे पत्रकारांनी हा मुद्दा लावून धरत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांना विचारणा केली असता त्यांनी बेजबाबदारपणे उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीने यापूर्वीच शहर बस वाहतुकीचा डीपीआर तयार केला होता. त्यामुळे त्यांनाच नवा डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इथेनॉलवरील बसबाबतचा अहवाल आला काय, अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तर दिले. आता इथेनॉलवरील बसचा अहवाल येण्यापूर्वीच सल्लागाराची नियुक्ती कशी करण्यात आली, या प्रश्नावरही सिंगारे यांनी बगल दिली.