शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा इतिहास मांडणारा दीर्घांक ‘वास्तुदेवता’

By admin | Updated: June 30, 2014 00:47 IST

कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी

वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित नाटक : विसासंचा ‘घर आंगण’ उपक्रमनागपूर : कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी तिला निर्जीव म्हणता येत नाही. कारण या वास्तुत सजीव माणसांच्या आठवणी असतात. सुख, दु:खाचा क्षण या वास्तुने प्रामाणिकपणे जपला असतो. अशा अनेक वास्तु असतात आणि अनेक वास्तु काळाच्या ओघात संपूनही जातात, नष्ट होतात. काही वास्तु मात्र दुर्लक्षित आणि गतवैभवाच्या आठवणीत रमल्या आहेत. नव्या पिढीला हा इतिहास समजून घ्यावासा वाटत नसला तरी याच इतिहासाच्या भरवशावर त्यांचे भविष्य घडणार असते. वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित याच आशयाचे ‘वास्तुदेवता’ हे नाटक विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात सादर करण्यात आले. संस्थेतर्फे ‘घर आंगण’ या उपक्रमांतर्गत या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. चोरघडे यांच्या कथेचे नाट्यरुपांतरण पराग घोंगे यांनी केले होते. या एकांकिकेचे दिग्दर्शन विनोद इंदूरकर यांनी केले. विदर्भात भोसले घराण्याने केलेली क्रांती त्यांचा शूरत्वाचा इतिहास लखलखीत आहे. आपल्या वीरत्वाने स्वत:च्या राज्याचा विस्तार करणाऱ्या पराक्रमी राजांत भोसले घराण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना नागपूरकर भोसलेंचा पराक्रम कळत नाही म्हणून वा. कृ. चोरघडे यांना दु:ख होते. ही वेदना त्यांच्या वास्तुदेवता या कथेतून समोर येते. पराक्रमाचा इतिहास आहे, तसाच अंतर्गत वादही यात आहे. हा इतिहास कायम राहू शकला नाही, याची खंत या वास्तुदेवतेला आहे. ही खंत, वेदना आणि आठवण व्यक्त करणारी ही एकांकिका सादर करण्यात आली. यात पराग घोंगे आणि सीमा गोडबोले यांनी भूमिका केली. त्यांनी आपल्या अभिनयातून हा विषय दमदारपणे मांडला. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत संजय काशीकर यांनी सांभाळले. या उपक्रमाला नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)