शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुपदासाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’

By admin | Updated: February 13, 2015 02:20 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राजकारण तापले आहे. विद्यापीठ वर्तुळातून अनेक जणांनी अर्ज दाखल केला असून ...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राजकारण तापले आहे. विद्यापीठ वर्तुळातून अनेक जणांनी अर्ज दाखल केला असून कमीतकमी पाच उमेदवारांमध्ये तर आपला क्रमांक लागावा याकरिता इच्छुकांनी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केले असल्याची माहिती आहे. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी शोध समितीची मुंबईला बैठक होणार आहे. या बैठकीत अर्जांच्या छाननीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी ही होती. या पदासाठी सुमारे ३० अर्ज आले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. यातील सुमारे १० ते १२ अर्ज हे नागपूर विद्यापीठाच्या वर्तुळातील व्यक्तींचेच आहेत. यात विद्यापीठ प्रशासनातील आजी-माजी अधिकारी, प्राधिकरण सदस्य, विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. यातील अनेक सदस्यांनी निरनिराळ््या माध्यमातून ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. याकरिता काहींच्या तर नवी दिल्ली तसेच मुंबई वाऱ्यादेखील वाढल्या असल्याची माहिती आहे. शिवाय या काळात कुठल्याही प्रकारे स्वत:वर ‘फोकस’ होणार याचे उमेदवारांकडून पुरेपुर प्रयत्न सुरू आहेत. काही उमेदवारांनी मात्र विद्यापीठाच्या विकासासंदर्भात नेमके ‘व्हीजन’ काय असेल याच्या तयारीवर भर दिला आहे. (प्रतिनिधी)१४ तारखेला शोध समितीची बैठकदरम्यान, कुलगुरुपदासाठी आलेल्या अर्जांची शोध समितीकडून छाननी कधी होते याकडे लक्ष लागले आहे. १४ फेब्रुवारी रोजी शोध समितीची मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीचा नेमका ‘अजेंडा’ अद्याप ठरला नसला तरी आलेल्या अर्जांवरच चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. या समितीकडून कुलपती कार्यालयाला पाच नावांची शिफारस करण्यात येईल. कुलपती या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतील. त्यामुळे पहिल्या पाचात येण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ आहे.