शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

एलकेपी सिक्युरिटी लि. चा घोटाळा उघड

By admin | Updated: November 17, 2014 01:05 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका वित्तीय कंपनीची भर पडली आहे. एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड, धंतोली असे या कंपनीचे नाव असून,

४० लाखांचा गंडा : रानडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका वित्तीय कंपनीची भर पडली आहे. एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड, धंतोली असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीच्या संचालक दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.मिलिंद रानडे आणि त्याची पत्नी नीता रानडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी धंतोलीतील अमरज्योती पॅलेसच्या दुसऱ्या माळ्यावर एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड कंपनीचे कार्यालय थाटले होते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मिलिंद आणि नीता रानडे नागरिकांना त्यांच्याकडील रक्कम गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. वर्धा मार्गावरील हिंदुस्तान कॉलनीत राहाणारे चंद्रशेखर विनायक देशपांडे यांची रानडे दाम्पत्यासोबत ओळख होती. अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविल्यामुळे देशपांडे यांनी रानडेच्या कंपनीत ४० लाख रुपये गुंतवले. ५ सप्टेंबर २००८ ते११ डिसेंबर २०१३ पर्यंत रानडे - देशपांडे यांच्यातील व्यवहार चांगला होता. नंतर मात्र आपली रक्कम परत मागण्यास गेलेल्या देशपांडे यांना रानडे दाम्पत्याने टाळणे सुरू केले. वारंवार चकरा मारूनही रानडे दाम्पत्य रक्कम परत करत नव्हते. ते असंबंध्द उत्तरे देत असल्यामुळे रानडे दाम्पत्याने फसवणूक केल्याचे देशपांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे देशपांडे यांनी धंतोली ठाण्यात धाव घेतली. (प्रतिनिधी)पोलिसांनीही केली होती बोळवणदेशपांडे यांनी रक्कम गुंतविल्याची कागदपत्रे तसेच फसवणूकीचे पुरावे देऊनही प्रारंभी पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे देशपांडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अखेर धंतोली पोलिसांनी शनिवारी मिलिंद आणि त्याची पत्नी नीता रानडे या दोघांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान, रानडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.