शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीचा दिवा पेटवा, मदत देताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा नकोच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:51 IST2025-10-20T14:48:38+5:302025-10-20T14:51:36+5:30
Nagpur : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसह विदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Light the lamp of prosperity in the homes of farmers, do not limit it to 2 hectares while providing assistance
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसहविदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या घरात आशेचा दिवा पेटविण्यासाठी सरकारने नुकसान भरपाई करताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा शिथिल करून पूर्वीप्रमाणे ३ हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हुकूमचंद आमधरे यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या भेटीत आमधरे यांनी विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा रावल यांच्याकडे मांडल्या.
व्यथा रावल यांच्याकडे मांडल्या. बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची तातडीने मदत करावी. ज्या भागात पूरस्थिती बिकट आहे अशा जिल्ह्यात सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. सर्व पिकांसाठी भावांतर योजना लागू करावी. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. सर्व सरकारी योजना मंजुरीची कागदोपत्री प्रक्रिया सुलभकरावी. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात राहण्यासाठी मोफत वसतिगृह सुरू करावे. मनरेगा योजना लागू करावी आणि प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत कामे सुरू करावीत. यासाठी तालुका स्तरावर यंत्रणा उभी करावी. ज्या परिवारातील सदस्य मृत्यू झाले आहेत, त्यांना मोबदला आणि सरकारी नोकरी द्यावी, अशा मागण्या आमधरे यांनी याप्रसंगी केल्यात.