शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सासू आणि नणंदेच्या खुनातील महिलेची जन्मठेप हायकोर्टात रद्द

By admin | Updated: February 21, 2016 03:07 IST

सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ...

सासरच्या चौघांना दिले होते अन्नातून विष : दोघे बचावले होतेनागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द करून तिला दोषमुक्त केले. सुनिता किशोर सोयाम (२०), असे आरोपी महिलेचे नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, सुनिताचा विवाह मे २०१० मध्ये किशोर सोयामसोबत झाला होता. खुद्द किशोर, त्याचे वडील मंगरू (६०), आई कमलाबाई (५०), भाऊ सचिन (२१) आणि नणंद सोनी (१८) आणि खुद्द सुनिता एकत्र राहत होते. सुनिता ही किशोरला सतत मला तू पसंत नाहीस, माझ्या वडिलाने माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून दिले आहे. ती भांडण करून किशोरला टोचून बोलायची, सोडचिठ्ठी मागत होती, सोडचिठ्ठी दिली नाही तर सर्वांना पाहून घेण्याची धमकी देत होती. तिने मंगळसूत्रही तोडून फेकले होते. ४ जानेवारी २०१२ रोजी किशोर हा कामानिमित्त बाहेर गेला होता. तो रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी परतला असता त्याला त्याचे आई, वडील, भाऊ आणि बहीण उलट्या करताना दिसले होते. त्यांनी सुनिताने जेवणातून विष दिल्याचे त्याला सांगितले होते. या सर्वाना शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले असता कमलाबाई आणि सोनीचा मृत्यू झाला होता. उपचारानंतर मंगरू आणि सचिन हे दोघे बचावले होते. किशोरच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी ७ जानेवारी २०१२ रोजी भादंविच्या ३०२, ३०७, ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल करून सुनिताला अटक केली होती. १२ मार्च २०१३ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनिताला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप, १ हजार रुपये दंड, ३०७ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि ३२८ कलमांतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. या सर्व शिक्षांना आव्हान देणारे अपील सुनिताने उच्च न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात आरोपी महिलेच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)