शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रवी अग्रवालच्या पिस्तुलाचा परवानाही नागालॅण्डचाच

By admin | Updated: August 20, 2016 02:34 IST

अब्जोवधींची सट्टेबाजी करणाऱ्या डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार रवी अग्रवाल याच्याकडे सापडलेल्या पिस्तुलाचा परवानाही नागालॅण्डचाच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

डब्ब्यात गोलमाल : अनेक बाबी गुलदस्त्यात नागपूर : अब्जोवधींची सट्टेबाजी करणाऱ्या डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार रवी अग्रवाल याच्याकडे सापडलेल्या पिस्तुलाचा परवानाही नागालॅण्डचाच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्याच्या भावाकडे यापूर्वी आढळलेला पिस्तुल परवाना नागालॅण्डचाच होता. विशेष म्हणजे, तब्बल ५० काडतुसांसह पिस्तुल बाळगणाऱ्या रवी अग्रवालने त्याच्याकडे पिस्तुल, काडतूस किंवा परवाना आहे, त्याची पोलिसांना कल्पनाही दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी एका वित्तीय संस्थेच्या लॉकरची तपासणी केली तेव्हा पिस्तुल आणि काडतूस आढळले. त्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एक नवे वळण मिळाले. या संबंधाने गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता डब्बा प्रकरणातील अनेक बाबी गुलदस्त्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे सांगून त्यांनी काही बाबींवर खुलासे करता येणार नाही,असे म्हटले. मात्र, पिस्तुल आणि काडतुसात नवीन गुन्हा दाखल करणार काय, त्याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार सांगू शकतात, असे ते म्हणाले. अभिनाश कुमार यांनी या संदर्भात चुप्पी साधली आहे, हे विशेष ! दुसरे म्हणजे, गुन्हेशाखेच्या पोलिसांनी उच्च न्यायालयात मंगळवारी शपथपत्र दाखल केले. त्यात डब्बा सट्टेबाजीच्या आड समांतर शेअर मार्केट सुरू करून देशविदेशातील हजारो व्यापाऱ्यांना अब्जोवधींचा फटका देणाऱ्या रवी अग्रवाल याचा खास साथीदार कन्नी थावरानी याची एकट्याची २०१२ ते २०१६ या कालावधीतील उलाढाल १ लाख हजार १८ कोटी रुपयांची असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतने बुधवारच्या अंकात तसे ठळकपणे प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय ! कन्नीकडून रवीनेच ही उलाढाल करून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरे म्हणजे, अन्य एका अग्रवालची उलाढाल ५ हजार कोटींची आहे. अन्य आरोपींच्या व्यवहाराची माहिती पोलिसांकडून उघड झालेली नाही. दुसरे म्हणजे, व्हायरल झालेला गोळीबाराचा व्हिडीओ, त्याची चौकशी आणि कारवाईसंदर्भातील अनेक प्रश्नांची पोलिसांकडून उत्तरे मिळत नसल्याने डब्ब्याचा गोलमाल नव्याने चर्चेला आला आहे. (प्रतिनिधी)