शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चर झालेल्या आयुष्यावर शिक्षणाची मात

By admin | Updated: June 10, 2015 03:08 IST

वाहनांच्या पंक्चरच्या प्रतीक्षेत बसलेल्या वडिलांची आणि पदरमोड करून घर चालविणाऱ्या आईची होणारी धावपळ पाहून प्राची आणखी खंबीर झाली.

नागपूर : वाहनांच्या पंक्चरच्या प्रतीक्षेत बसलेल्या वडिलांची आणि पदरमोड करून घर चालविणाऱ्या आईची होणारी धावपळ पाहून प्राची आणखी खंबीर झाली. अभ्यासात सुधारणा केली. आतापर्यंत साधारण गुण घेणाऱ्या प्राचीने दहावीत ८३.६० टक्के गुण घेतले. एवढे गुण घेण्याची ही तिची पहिलीच वेळ. ती शाळेत दुसरी आली. भवानीनगर, पारडी येथील रहिवासी प्राची रवी पाटील त्या विद्यार्थिनीचे पूर्ण नाव. लकडंगज येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची ती विद्यार्थिनी. प्राचीचे वडील दहावी नापास. परंतु मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड असते. यासाठी दोन पैसे जास्तीचे मिळावे म्हणून पहाटेपासूनच रस्त्याच्या कडेला पंक्चरचे दुकान लावतात. यात प्राचीही मदत करते. कधी वाहनांमध्ये हवा भरण्यात तर कधी पंक्चर काढण्यात. प्राची म्हणाली, रस्त्याच्या कडेला बसून पंक्चर दुरुस्त करणाऱ्या बाबांना पाहून मन कासावीस होते. पूर्वी अभ्यासात सर्वसाधारण होते. परंतु दहावीची परीक्षा जवळ येताच मेहनत घेतली. रात्री ३ वाजता उठून अभ्यास करायची. या प्रयत्नाला यशही आले. कधी नव्हे ते ८३.६० टक्के गुण मिळाले. भविष्यात आयएएस अधिकारी व्हायचे हे स्वप्न आहे. पंक्चरवाल्याची मुलगी म्हणून हिणवणाऱ्यांना दाखवून द्यायचे आहे. यापुढे स्वत:च्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: घेणार आहे. यासाठी शिकवणी वर्ग चालविण्याचा विचार आहे, असेही ती म्हणाली.(प्रतिनिधी)