'महाराष्ट्र केसरी'साठी विक्रांत जाधव विरुध्द विजय चौधरीमध्ये अंतिम सामना

By Admin | Updated: January 10, 2016 12:08 IST2016-01-10T12:06:00+5:302016-01-10T12:08:46+5:30

५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब कोणाला मिळणार ते आज संध्याकाळी ठरणार आहे.

Last match in 'Vijay Chaudhary' against Vikrant Jadhav for 'Maharashtra Kesari' | 'महाराष्ट्र केसरी'साठी विक्रांत जाधव विरुध्द विजय चौधरीमध्ये अंतिम सामना

'महाराष्ट्र केसरी'साठी विक्रांत जाधव विरुध्द विजय चौधरीमध्ये अंतिम सामना

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १० - येथे सुरु असलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब कोणाला मिळणार ते आज संध्याकाळी ठरणार आहे.  मॅट विभागातून मुंबईच्या विक्रांत जाधवने बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत पुण्याच्या महेश मोहोळचा पराभव केला. विक्रांतला १७ तर, महेशला १० गुण मिळाले. 
माती विभागातून जळगावच्या विजय चौधरीने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने सोलापूरच्या बाला रफिक शेखवर मात केली. महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आता मॅट विभागातून आलेल्या विक्रांत जाधव आणि माती विभागातून आलेल्या विजय चौधरीमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. 

Web Title: Last match in 'Vijay Chaudhary' against Vikrant Jadhav for 'Maharashtra Kesari'