शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकली अंजुमन ट्रस्टची जमीन

By admin | Updated: May 8, 2015 02:19 IST

अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टची कळमेश्वरच्या कारली येथील जमीन ट्रस्टच्या मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकणाऱ्या एका आरोपीचा

नागपूर : अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टची कळमेश्वरच्या कारली येथील जमीन ट्रस्टच्या मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड मीर अली यांनी काम पाहिले.हबीबूर अब्दुल रहेमान (६५) असे आरोपीचे नाव असून, तो भालदारपुरा मोहम्मद अली चौक येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, एम.ए. अजीज मोहम्मद खान हे अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष असताना त्यांनी १९८२ मध्ये कारली या गावातील किसना कोठीराम कुबडे यांच्या मालकीची १०.३२ हेक्टर शेतजमीन खरेदी केली होती. खरेदीपासूनच ही जमीन पडित होती. १५ सप्टेंबर २००३ रोजी एम.ए. अजीज यांचे निधन झाले. गैरफायदा घेत हबीबूर याने स्वत:ला एम.ए. अजीज असल्याचे भासवून ६ डिसेंबर २००३ रोजी या जमिनीचे विक्रीपत्र कळमेश्वरच्या उपनिबंधक कार्यालयामार्फत मोमीनपुरा येथील शेख इरफान शेख अब्दुल याच्या नावे करून दिले. त्यावेळी रफल मकसूद आलम बारी याने साक्षीदार म्हणून विक्रीपत्रावर सह्या केल्या होत्या. त्यानंतर ही जमीन शेख इरफान यांनी हरिप्रसाद साधूलाल शाह यांना विकली होती. पुढे या जमिनीची अनेकांना विक्री करण्यात आली. त्यात सुषमादेवी विनोदकुमार सराफ यांच्या एम. सराफ बंधू कंपनीचा समावेश होता. या ट्रस्टच्यावतीने सदर येथील अंजुमन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची इमारत कारली येथील ट्रस्टच्या या जमिनीवर बांधून ती हस्तांतरित करावयाची असल्याने या ट्रस्टचे लेखा अधिकारी सलीम जाकीर अख्तर हुसैन मिलवाला यांनी पटवारी कार्यालयात जाऊन या जमिनीच्या भूमापन संदर्भातील कागदपत्रे प्राप्त केली असता ही बनवाबनवी उजेडात आली. मिलवाला यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून ७ आॅगस्ट २०१४ रोजी भादंविच्या ४१९, ४२०, ४२३, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रारंभी शेख इरफान आणि रफल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १३ जानेवारी २०१५ रोजी हबीबूरला अटक करण्यात आली. या प्रकरणी १३ एप्रिल २०१५ रोजीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा म्हणून हबीबूरने दाखल केलेला अर्ज प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने फेटाळला. (प्रतिनिधी)