धावत्या ऑटोतून महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:07+5:302021-04-12T04:07:07+5:30

नागपूर : धावत्या ऑटोतून एका वृद्ध महिलेचे बाजूला बसलेल्या दोन चोरट्या महिलांनी सोन्याचे दागिने लंपास केले. अजनी पोलीस ठाण्याच्या ...

Lampas the woman's jewelry from the running auto | धावत्या ऑटोतून महिलेचे दागिने लंपास

धावत्या ऑटोतून महिलेचे दागिने लंपास

नागपूर : धावत्या ऑटोतून एका वृद्ध महिलेचे बाजूला बसलेल्या दोन चोरट्या महिलांनी सोन्याचे दागिने लंपास केले.

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. इंदिरानगर जाटतरोडी येथील रहिवासी अनुसयाबाई भावराव निरगुडे (वय ७५) या शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ऑटोत बसून, वंजारी नगरातून वंजारी दर्गा परिसरात जात होत्या. या ऑटोत आणखी दोन अनोळखी महिला बसून होत्या. त्या महिलांनी वृद्ध अनुसयाबाई यांच्या जवळची पिशवी बेमालूमपणे कापून त्यात ठेवलेले ८७ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरी गेल्यानंतर अनुसयाबाई यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्यांचा मुलगा बाबाराव निरगुडे यांना ही माहिती दिली. बाबाराव यांनी अजनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. तो ऑटो आणि चोरट्या महिलांचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Lampas the woman's jewelry from the running auto