शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या तुटवड्यामुळे एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य धोक्यात

By admin | Updated: May 14, 2016 03:08 IST

एआरटी (अ‍ॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) औषध नि:शुल्क मिळत नसल्यामुळे एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे,

जनहित याचिका दाखल : हायकोर्टाची प्रतिवादींना नोटीसनागपूर : एआरटी (अ‍ॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) औषध नि:शुल्क मिळत नसल्यामुळे एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशा दाव्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अवकाशकालीन न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर प्रतिवादींना नोटीस बजावून १७ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.प्रतिवादींमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना, राज्य शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मेडिकल व मेयोचे अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय कामठीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. एड्सग्रस्त रुग्णांना सहकार्य करणाऱ्या संजीवन बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे. एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांना एआरटी औषध नि:शुल्क उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल, मेयो व कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र कार्यरत आहे. सध्या या तिन्ही केंद्रांतून रुग्णांना नि:शुल्क एआरटी औषध मिळत नाही. या औषधाचा तुटवडा असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हे औषध एकदा सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू नये. खंड पडल्यानंतर शरीरातील विषाणू या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतात. यामुळे खंड पडल्यानंतर औषध घेतल्यास विषाणूंवर काहीच परिणाम होत नाही. रुग्णांना हे औषध नियमित घेणे आवश्यक आहे. एआरटी केंद्रातून औषध मिळाले नाही तर, रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागते. पहिल्या टप्प्यातील औषधाचा १८००, दुसऱ्या टप्प्यातील औषधाचा २८०० तर, तिसऱ्या टप्प्यातील औषधाचा २५०० ते ५००० रुपये मासिक खर्च आहे. गरीब रुग्णांना एवढा खर्च करणे शक्य होत नाही. समाजात एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. ओळख पुढे येऊ नये म्हणून हे रुग्ण औषधाच्या तुटवड्याची जाहीर तक्रार करीत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विवेक अवचट यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)