शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:08 IST

मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी, पण केंद्रावरून पाठवतात परत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्याने लसीकरण मोहिमेला अधिक ...

मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी, पण केंद्रावरून पाठवतात परत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्याने लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मनपाचे पथक घरोघरी जाऊन ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांचा डाटा गोळा करत आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे. परंतु केंद्रावर गेल्यानंतरही त्यांची पुन्हा नोंदणी केली जात असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.

महाल भागातील नागरिकांच्या घरी मनपाचे पथक पोहचले. ४५ वर्षांवरील नागरिकांची माहिती घेण्यात आली. संबंधित नागरिकांचे मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ते प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रात लसीकरणासाठी पोहोचले असता मनपा कर्मचारी अशा नोंदणीनुसार लसीकरणास नकार देतात. नागरिकांना पुन्हा नोंदणी करावी लागते. वास्तविक घरोघरी जाणाऱ्या पथकाकडून कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची मागणी केली जात नाही. परंतु लसीकरण केंद्रावर पोहचल्यानंतर गंभीर आजार असल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले जाते. अशा स्वरूपाच्या अडचणीचा लोकांना सामना करावा लागत आहे.

....

खासगी लॅबच्या रिपोर्टमध्ये घोळ

खासगी लॅबचा कोविड रिपार्टसंदर्भात घोळ सुरू आहे. १८ वर्षीय फातिमा दाऊद हिने ध्रुव पॅथ लॅबमध्ये १९ मार्चला दुपारी १२.५२ च्या सुमारास आरटीपीसीआर टेस्ट साठी सॅम्पल दिले. १९ मार्चला सायंकाळी ४.५२ ला रिपोर्ट जारी करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह आली. रिपोर्टबाबत शंका असल्याने पुन्हा बाथो पॅथ लॅबमध्ये रात्री ९ वाजता तपासणी केली. २० मार्चला तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.