कृष्ण जन्मला ग सखे...कृष्ण जन्मला!

By Admin | Updated: August 25, 2016 02:38 IST2016-08-25T02:36:13+5:302016-08-25T02:38:22+5:30

विश्व हिंदू परिषदेद्वारा आज बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

Krishna was born and born ... Krishna was born! | कृष्ण जन्मला ग सखे...कृष्ण जन्मला!

कृष्ण जन्मला ग सखे...कृष्ण जन्मला!

श्रीकृष्ण जन्माष्टमी : शहरात निघाली भव्य शोभायात्रा, देखावे बघायला भाविकांची गर्दी
नागपूर : विश्व हिंदू परिषदेद्वारा आज बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने धंतोलीतील गोरक्षण सभेच्या प्रांगणातून श्रीकृष्ण पूजनानंतर या भव्य शोभायात्रेला प्रारंंभ झाला.
विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय संघटनेचे सह महामंत्री विनायकराव देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्णासारख्या योद्ध्याची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण भगवान हे पूर्णावतार होते असे त्यांनी सांगितले. सोबतच संत ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वरांच्या कार्यकर्तृत्वावरही त्यांनी प्रकाश टाकला.
शोभायात्रेच्या अग्रभागी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, विजयनगरच्या ४० विद्यार्थिनी डोक्यावर कलश घेऊन चालत होत्या. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, गोरक्षण प्रभागाचे नगरसेवक संदीप जोशी, श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शशिकांत बोदड़, कार्याध्यक्ष बी. सी. भरतीया, अमित गाड़गे, राजकुमार शर्मा, गजेंद्र पांडे, पं. उमेश शर्मा, सुरेश अग्रवाल, गुरुमुख ममतानी, प्रा. विजय केवलरामानी, नवनीतसिंह तुली, श्रीराम महाराज, भगीरथ महाराज, हेमंत जांभेकर, श्रीपाद रिसालदार, सुदर्शन शेंडे, मृणाली वाघमारे, मयुरी मते, जयप्रकाश गुप्ता, सुरेश झा, देवेंद्र चटवाल, राजकुमार शर्मा हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते ‘गोरक्षण विशेषांक’चे प्रकाशनही करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल गाड़गे, विश्राम जामदार, सुदर्शन शेंडे, प्रभाकरराव देशमुख, रवींद्र पडगिलवार, अमित गाड़गे, राजेश मुरकुटे, नीलेश टेक ाड़े, प्रवीण घुले, विशाल पुंज, ज्येष्ठ स्वयंसेवक, समाजसेवी संघटना व संस्थांचे पदाधिकारी,व्यवस्थापन समिती, व्यापारी संघटनांनी सहाकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Krishna was born and born ... Krishna was born!