शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे आमिष दाखवून मजुराच्या पत्नीचे अपहरण

By admin | Updated: July 21, 2014 00:51 IST

काम लावून देतो, असे सांगून एका आरोपीने पती-पत्नीला इतवारी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात आणले. पतीला एका ठिकाणी थांबविले आणि पत्नीचे अपहरण केले. दरम्यान इतवारी

नागपूर : काम लावून देतो, असे सांगून एका आरोपीने पती-पत्नीला इतवारी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात आणले. पतीला एका ठिकाणी थांबविले आणि पत्नीचे अपहरण केले. दरम्यान इतवारी लोहमार्ग पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या पत्नीचा २४ तासात तपास लावण्यात यश मिळविले असून आरोपी अद्याप फरारआहे.महेशकुमार वटी आणि त्यांची पत्नी मायाबाई (२०) रा. मंडवा, गोंदिया हे कामासाठी टाटा पॅसेंजरने शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता इतवारी रेल्वेस्थानकावर आले. तेथे ते प्लॅटफार्म क्रमांक १ वर नागपूरला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होते. तेवढ्यात एक अज्ञात आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने पती-पत्नीची चौकशी करून त्यांना काम लावून देण्याचे आमिष दाखविले. त्याने या दोघांनाही शहरात आणले. तुमची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, त्यासाठी फोटो काढावे लागतील, अशी थाप देऊन त्याने महेशकुमार वटी यांच्या जवळून ५०० रुपये घेतले. त्यांना एका ठिकाणी बसवून त्यांच्या पत्नीला फोटो काढण्यासाठी घेऊन गेला. बराच वेळ होऊनही पत्नी न परतल्याने महेशकुमार वटी सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले. घटनास्थळ इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांना पुन्हा इतवारी रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आले. तेथे त्यांची हकीकत ऐकल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पती-पत्नीला नागपूर शहरात नेण्यापूर्वी आरोपीने महेशकुमार वटी यांच्या मोबाईलवरून एका महिलेला फोन केला होता. त्या महिलेचा मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला असता ती मोबाईल उचलत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिचा मोबाईल लोकेशनवर लावला. रात्री १२ वाजता या महिलेचे लोकेशन पोलिसांना भेटले. अखेर त्या महिलेने फोन उचलून आरोपीची रेल्वेगाडीत भेट झाल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपी महेशकुमार वटीच्या पत्नीला घेऊन काटोलला गेला होता. तेथे शौचास जाण्याचे कारण सांगून तो पळून गेला. तेथील पोलीस पाटलाने या महिलेस रात्रभर आपल्या घरी ठेऊन सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आणले. संबंधित महिला इतवारी लोहमार्ग पोलिसात पोहोचली. परंतु आरोपीने तिच्यावर कुठलीही जबरदस्ती केली नसल्याचे तिने दिलेल्या बयाणात म्हटले आहे. दरम्यान आरोपीचा दोन दिवसात शोध घेण्यात यश मिळेल, असा विश्वास इतवारी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल घारपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)