शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम बारमध्ये ‘खुनी संग्राम’

By admin | Updated: June 11, 2014 01:38 IST

आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक

गाण्याची फर्माईश कारणीभूत : एक ठार, एक जखमी
नागपूर : आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेने जगनाडे चौक परिसरात आणि सीताबर्डी भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सुमित सुरेश तिवारी (३०), असे मृताचे नाव आहे. मोहम्मद रियाज हक (३०), असे जखमीचे नाव आहे. ते सीताबर्डी टेम्पल बाजार पिंजारी गल्ली येथील रहिवासी आहेत. नगरसेवक प्रशांत धवड यांच्या पत्नीच्या नावे हा बार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बारला आॅर्केस्ट्राचा (मनोरंजन) परवाना आहे. परवान्याआड अधूनमधून या बारमध्ये ‘डान्स’ चालतात. आॅर्केस्ट्रात गाणाऱ्या दोन तरुणींसह एकूण सहा बाला या बारमध्ये असतात. या बालांचा पुरवठा राजू दलाल करीत असतो. सात-आठ वर्षांपूर्वी त्याच्याच भरवशावर सीताबर्डीत शेरे पंजाबमध्ये ‘डान्स फ्लोअर’ चालायचा. या प्रकरणातील मृत सुमित तिवारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने काही वर्षांपूर्वी सीताबर्डी भागात कल्लू यादव आणि गाडगीलवार , अशा दोन जणांचा खून केलेला आहे.
डान्स चालू है क्या?
या दोन्ही खुनात सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून तो निर्दोष सुटला होता. सोमवारी रात्री सुमित तिवारी हा सीताबर्डीतीलच त्याचे मित्र मोहम्मद सलाम मोहम्मद सुफी (४७), मोहम्मद रियाज आणि आणखी दोन-तीन जणांसोबत हॉटेल राजसन्समध्ये बसले होते. त्यांना डान्स पाहण्याची इच्छा झाली. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी संग्राम बारचा व्यवस्थापक किशोर याला फोन करून ‘डान्स चालू है क्या’, अशी विचारणा केली. त्याने होकार देताच मोहम्मद सलाम, रियाज आणि सुमित हे दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन संग्राम बारमध्ये दाखल झाले. रात्री १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास कार्यक्रम रंगात आलेला असतानाच मोहम्मद सलाम याने आपल्या आवडत्या गाण्याची फर्माईश केली. त्यामुळे इतर चार-पाच अनोळखी लोक चिडले. त्यांच्यात भांडण झाले. परिणामी अनोळखी लोकांनी सलामसोबतच्या मोहम्मद रियाज याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी सुमित तिवारी धावला असता त्याला या अनोळखी हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला करून आणि दगडाने ठेचून घटनास्थळीच ठार केले.
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली आणि पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृत सुमित याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे रवाना केला. मोहम्मद सलाम याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अनोळखी लोकांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७, १४८, ३०२, भारतीय हत्यार कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. मात्र संशयित म्हणून बार मॅनेजर, वेटर, इतर कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची माहिती जाणून घेतली जात आहे. सुमितचा खून सिंबले बंधू आणि साथीदारांनी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जखमी मोहम्मद रियाज याला धंतोलीच्या श्युअरटेक इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)