शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

साधनशुचिता पाळा, वाद टाळा

By admin | Updated: July 19, 2014 02:21 IST

भाजपाच्या हातात देशातील नागरिकांनी मोठ्या

सरसंघचालकांचे अमित शहांना ‘बौद्धिक’ : पक्ष मजबुतीवर भर देण्याचा मंत्रयोगेश पांडे  नागपूरभाजपाच्या हातात देशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी देशाची सत्ता सोपविली आहे. पक्षातील अंतर्गत वाद टाळून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाजपाची खरी ओळख ही साधनशुचिता आहे व ती जपण्याची मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वावर आली आहे. हे करीत असताना देशपातळीवर पक्ष मजबुतीवर भर देण्यात यावा या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पक्षबांधणीचा मंत्र दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे दीड तास सरसंघचालकांशी चर्चा केली.निवडणुकांनंतर निर्माण होत असलेले वैदिक प्रकरणासारखे निष्कारण वाद यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा वादांपासून व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांपासून भाजपा नेत्यांनी दूर रहावे. देशातील भ्रष्टाचार, महागाई आणि सुरक्षा यांच्याकडे पाहून देशाने भाजपाला कौल दिला. जर भाजपाला मजबूत करायचे असेल तर भावनिक मुद्यांपेक्षा या अपेक्षांच्या पूर्ततेवर जोर देण्यात यावा. अन्यथा पाच वर्षांनंतर जनता भाजपालाही ‘जागा’ दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही असे परखड मतदेखील सरसंघचालकांनी व्यक्त केले. यावेळी अमित शहा यांचे आगामी संकल्प, पक्षबांधणीसाठी नियोजन इत्यादीदेखील सरसंघचालकांनी जाणून घेतले अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षाचा सरकारवर वचक हवाचआज केंद्रात भाजपाचे सरकार असले तरी पक्षाने स्वत:ची भूमिका ठरवून घ्यावी. सरकार आणि पक्ष यांच्यात फरक असलाच पाहिजे व पक्षाचा सरकारवर अंकुश कसा राहील यासंदर्भात प्रयत्न करायला हवे. भाजपाध्यक्ष या नात्याने तुम्ही याचा आढावा घेतला पाहिजे असेदेखील सरसंघचालकांनी शहा यांना सांगितले. केवळ सरकारवर विसंबून न राहता किंवा अपेक्षांचे ओझे न लादता पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्यात यावा असा सल्लादेखील भागवत यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्रातदेखील संघ-भाजपाचा ‘लोकसभा पॅटर्न’?लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघाने उत्तर प्रदेश तसेच महत्त्वाच्या राज्यांत सक्रिय भूमिका पार पाडली होती. या राज्यांमध्ये भाजपाची संघटना बांधणी करण्यासाठीदेखील विशेष प्रयत्न करण्यात आले होते. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळ्यांवर पक्षाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे पाहता लोकसभा निवडणुकांप्रमाणेच राज्यातदेखील संघप्रचाराचा ‘पॅटर्न’ राबविणे कितपत योग्य ठरेल यावरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शहांची स्मृतिमंदिरास भेटदरम्यान, संघ मुख्यालयी जाण्याअगोदर अमित शहा यांनी रेशीमबाग येथील संघाच्या स्मृतिमंदिरास भेट दिली व संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राज्यसभा खासदार अजय संचेती, आमदार पंकजा मुंडे-पालवे, महापौर अनिल सोले यांची प्रमुख उपस्थिती होती.