शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

निसमर्थांसाठी राखीव पार्किंगची जागा सुरक्षित ठेवा

By admin | Updated: February 5, 2015 01:13 IST

निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव पार्किंगच्या जागेवर कुणालाही अतिक्रमण करू देऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.

हायकोर्टाचे आदेश : नासुप्र मुख्यालयातच नियमांची पायमल्लीनागपूर : निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव पार्किंगच्या जागेवर कुणालाही अतिक्रमण करू देऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.सार्वजनिक इमारतींमध्ये निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, लिफ्ट, पार्किंग स्वच्छतागृहे इत्यादी राखीव सुविधा असणे आवश्यक आहे़ या नियमाचे पालन होत नसल्यामुळे इंद्रधनू संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली असता याचिकाकर्त्याचे वकील अनुप गिल्डा यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयातच निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव पार्किंगच्या जागेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे सांगितले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन राज्यात कुठेही असा प्रकार घडायला नको, असे शासनाला सुनावले. तसेच, अ‍ॅड. गिल्डा यांना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी २ आठवड्यांनंतर निश्चित केली. नागपूर सुधार प्रन्यासने त्यांच्या मालकीच्या इमारतींमध्ये निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रावर दिली होती. त्याच्या प्रत्युत्तरात वरील बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. इंद्रधनू संस्थेची ही दुसरी जनहित याचिका होय. महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून जुन्या इमारतींमध्ये निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही दिली होती. परिणामी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मागण्या अपूर्ण राहिल्यास पुन्हा न्यायालयात येण्याची मुभा देऊन जुनी जनहित याचिका निकाली काढली होती. मनपा शब्द पाळण्यात अपयशी ठरल्यामुळे इंद्रधनू संस्थेने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)