शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शिक्षणाच्या क्रांतिज्याेतीला काेटी काेटी नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

नागपूर : अज्ञान, पुरुषप्रधानता आणि धर्माने लादलेल्या अंधश्रद्धेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत शिक्षणाचे हत्यार देऊन देशातील महिलांच्या उद्धाराचे दीपस्तंभ झालेल्या ...

नागपूर : अज्ञान, पुरुषप्रधानता आणि धर्माने लादलेल्या अंधश्रद्धेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत शिक्षणाचे हत्यार देऊन देशातील महिलांच्या उद्धाराचे दीपस्तंभ झालेल्या सावित्रीमाई फुले यांची आज जयंती. क्रांतिपुरुष ज्याेतिराव यांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेउन आद्यशिक्षिका हाेत सावित्रीमाईने तमाम स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेच्या चाैकटीतून काढत नव्या क्षितिजापर्यंत नेले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बराेबरीने काम करीत आहेत, ते या दाम्पत्यामुळे. त्यासाठी मुलींना शिकवायला जाताना सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला, प्रसंगी शेण व दगडधाेंड्यांचा मार सहन करीत अनंत यातना सनातनाकडून सहन कराव्या लागल्या. यातूनच स्त्री उद्धाराचा देदीप्यमान इतिहास निर्माण करणाऱ्या या माऊलीचा आज जन्मदिवस. यानिमित्त शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी या क्रांतिज्याेतिला अभिवादन केले.

‘महाज्योती’तर्फे व्याख्यान व महिलांचा सत्कार ()

ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती) च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. ‘महाज्योती’चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा ‘महाज्योती’च्या निमित्ताने शासन पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, अतुल लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या वंदना वनकर, ॲड. रेखा बाराहाते, डॉ. अंजली साळवे, दीनानाथ वाघमारे, कार्यकारी अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते. यावेळी प्रदीपकुमार डांगे यांनी ‘महाज्योती’च्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुरुटकर, नीता इटनकर, रंजना सुरुजुसे यांना सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सातार जिल्ह्यातून ज्योती साळुंखे प्रथम व निकिता राजाराम भगत द्वितीय तर वैभव रामचंद्र शिवतारे याने तृतीय स्थान मिळविले. संचालन दिव्या शहारे यांनी केले. महाज्योतीचे समन्वयक उमेश कोर्राम यांनी आभार मानले.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे शुक्रवारी तलाव परिसरात कार्यक्रम आयाेजित करण्यात आले. यावेळी ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. गिरीश दादीलवार, संयोजक भूषण दडवे, नगरसेविका वंदना भगत, महासचिव प्रभाकर भडके, ॲड. छाया यादव, राज्य अध्यक्ष गीता महाले, बापुसाहेब चरडे, ॲड. सूर्यकांत जायसवाल, प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक महासचिव जॉन थॉमस प्रामुख्याने उपस्थित हाेते. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे तसेच भिडेवाडा पहिली मुलींची शाळेस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून जीर्णोद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली.