शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

कळमना न्यू ग्रेन मार्केटच्या समस्या तातडीने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

नागपूर : कळमना न्यू ग्रेन मार्केटच्या समस्या तीन महिन्यात सोडविण्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार सेस कमी करण्याचे आश्वासन पशुसंवर्धन ...

नागपूर : कळमना न्यू ग्रेन मार्केटच्या समस्या तीन महिन्यात सोडविण्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार सेस कमी करण्याचे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी न्यू ग्रेन मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

शनिवारी कळमना मार्केट यार्डात एका कार्यक्रमात केदार यांनी हजेरी लावून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी द होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि सचिव प्रताप मोटवानी यांनी केदार यांची भेट घेऊन न्यू ग्रेन मार्केटसंबंधित समस्यांचे निवेदन दिले. त्यांनी प्रशासकीय भवनात विविध समस्यांवर व्यापाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी कळमन्याचे माजी सभापती अहमद पटेल, धान्य बाजारचे अध्यक्ष अतुल सेनाड, गोपाल कळमकर, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अर्जुन वैरागडे, राजू उमाठे, रमेश उमाठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी उपस्थित होते.

केदार म्हणाले, कळमना न्यू ग्रेन मार्केटमध्ये दुकानांचे हस्तांतरण आणि वैध रजिस्ट्री लवकरच करण्यात येईल. दुकानांचे विजेचे बिल कमी करण्यावर भर राहील. बाजारात थंड पाण्यासाठी आरओ मशीन, सुलभ शौचालय आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांना टोकन पद्धतीने होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यात येईल.

कळमना बाजारात नवीन दुकाने तयार असून व्यापाऱ्यांना लवकरच वितरित करण्यात येणार आहे, शिवाय न्यू ग्रेन मार्केटचे गेट लवकरच सुरू करण्यात येईल. प्रतिनिधीमंडळात आशिष अग्रवाल रमेश उमाठे, शिव गुप्ता, राजेश मदरानी, राजू काशीकर, प्रवीण शाहू, विकी अग्रवाल, जयेश शाह, सुरेश अग्रवाल, अरुण अग्रवाल उपस्थित होते.