शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सोळावं वरीस आनंदाचं...

By admin | Updated: January 1, 2016 04:12 IST

विद्युत रोषणाईचा झगमगाट, संगीताचे सूर आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात गुडबाय २०१५ असे म्हणत मावळत्या

युवकांचा न्यू इयर बॅश धडाक्यात पण ‘इनडोअर’ : फुटाळ्यावर तरुणाईची धूमनागपूर : विद्युत रोषणाईचा झगमगाट, संगीताचे सूर आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात गुडबाय २०१५ असे म्हणत मावळत्या वर्षाला गुरुवारी निरोप देण्यात आला. शहरातील हॉटेल, ढाबे, इमारतींच्या गच्चींवर आयोजित रंगीत-संगीत पार्टी रंगली. रात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजाळला. वेलकम २०१६ असा जल्लोष करीत नवीन वर्षाचे स्वागत करताना धम्माल नृत्याचा पिंगा घालत तरुणाईने नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले. यानिमित्ताने सर्वत्र सुरू असलेला जल्लोष रात्री उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला. सोळावं वरीस म्हणजे नवोन्मेषाचे, नवलाईचे आणि उत्साहाचे. यंदा टीन एजर्सने चांगलाच माहोल केला. वातावरणात मोकळेपणा आला आहे आणि खिशात बऱ्यापैकी पैसा या पिढीजवळ आहे. त्यात शिक्षण आणि परिस्थितीमुळे मुलांमध्ये आणि मुलींमध्येही आत्मविश्वास आहे. त्यामुळे हे टीनएजर्स नव्या वर्षाच्या स्वागतासाठी फुटाळ्यावर एकत्रित आले होते. कुणी पब्समध्ये तर कुणी टेरेसवर धम्माल करीत होते. संयमित पण जल्लोषात हा आनंदसोहळा रंगला. (वृत्त पान ५)उत्फुल्ल तरुणाईने फुलला फुटाळाफुटाळा तलावावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आ. प्रकाश गजभिये यांनी आॅर्केस्ट्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाविद्यालयीन युवक-युवतींसह अनेक लोक आपल्या कुटुंबासह फुटाळ्याला आले होते. बुट्टा, गरमागरम भजे, दाबेली आदींवर ताव मारून ते नव्या वर्षाचा आनंद घेत होते. नागपुरात जवळपास हजार लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित झाल्याचे फुटाळा तलाव हे एकमेव सार्वजनिक ठिकाण होते. आॅर्केस्ट्राच्या गीतावर तुफान ताल धरीत युवक-युवतींनी येथे नृत्याचा धमाल आनंद घेतला. यात युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. याप्रसंगी उत्फुल्ल तरुणाईने फुटाळा फुलला होता. अनेक मित्र-मैत्रिणी येथे रात्री १२ पर्यंत एकमेकांचा हात हातात घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करीत होते. पण १२ वाजल्यानंतर मात्र पोलिसांनी सर्वांनाच घरी जाण्याची विनंती केल्याने रात्री फुटाळा परिसर शांत झाला. ^सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगर्दीत कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी ३८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यातील सर्वाधिक आठ कॅमेरे शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक मार्गावर लावण्यात आले. सीताबर्डी, व्हेरायटी चौकात सहा कॅमेरे, अंबाझरी गार्डन-चार, फुटाळा चौपाटी-चार, बॉटनीकल गार्डन-चार, ट्रॅफिक पार्क-चार, लिबर्टी ते सदर-चार आणि पूनम चेंबर बैरामजी टाऊन भागात चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.