शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जोशी बेपत्ता; चौकशीला होणार सुरुवात

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

ठेवीदारांना थापा देऊन कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या देवनगरातील रविराज फायनान्स कंपनीच्या फसवणुकीचे प्रकरण तूर्त जैसे थे आहे. या प्रकरणाची चौकशी सोमवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक

रविराज फायनान्स फसवणूक प्रकरणनागपूर : ठेवीदारांना थापा देऊन कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या देवनगरातील रविराज फायनान्स कंपनीच्या फसवणुकीचे प्रकरण तूर्त जैसे थे आहे. या प्रकरणाची चौकशी सोमवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक सेलकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. रविराज फायनान्स कंपनीचा संचालक राजेश जोशी याने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा केली. आता तो गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. त्याने नियोजित अवधीत ठेवीदारांना रक्कम परत केली नसल्यामुळे अस्वस्थ गुंतवणूकदारांनी त्याची माहिती काढणे सुरू केले. तेव्हा जोशीने गुंतवणूकदारांच्या रकमेतून जमा केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावणे सुरू केल्याचे त्यांना कळले. एवढेच नव्हे तर देवनगरातील (विवेकानंद नगर) कार्यालयाची इमारतही त्याने विक्रीला काढल्याची चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. जोशीकडून रक्कम परत मिळत नाही, तो नुसता ‘तारीख पे तारीख’ देत असल्याने गुंतवणूकदारांना फसगत झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पन्नासावर गुंतवणूकदारांनी गुरुवारी सायंकाळी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरण कोट्यवधींच्या फसवणुकीचे असल्याने धंतोलीच्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेऊन शनिवारी सायंकाळी ते परिमंडळ चारचे उपायुक्त चंद्रकिशोर मिना यांच्याकडे पाठविले. मिना यांनी पोलीस आयुक्त-सहआयुक्तांकडे हे प्रकरण निर्णयासाठी पाठविले असून, सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)