शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिवंतपणीच तो झाला देव!

By admin | Updated: May 14, 2014 00:11 IST

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.

राजुरा अपघाताला कलाटणी : याची डोळा मरण पाहिले

विठ्ठल कांबळे - घाटंजी

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.आणि दुसर्‍यादिवशी निरोप येतो,‘ बंडू जिवंत आहे.!’ तो जिवंतपणीच देव झाला. बंडूला गावी आणण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्याला जिवंत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जिवंतपणी मृत्यू अनुभवण्याचा प्रसंग यवतमाळ जिल्ह्यातील करमना येथील बंडू मांडवकर या तरुणावर आला.‘बंडू जिवंत आहे’ पुन्हा गाडी करून नातेवाईक राजुरा येथे गेले. बंडूला पाहून आनंदित झाले. त्याला गावी घेवून आले. तो खापरी येथे नातेवाईकाकडे आला आणि लोकांनी त्यास पाहण्यास एकच गर्दी केली. इकडे नातेवाईक व कुटुंबाच्या मनात धस्स झाले.

घाटंजी तालुक्यातील करमना येथे गुलाब मांडवकर आपल्या परिवारासह राहतात. त्यांना चार मुलं. तिसर्‍या नंबरचा बंडू नावाचा मुलगा. त्याला दोन अपत्य आहेत. तो आठ वर्षांपूर्वी गावातून निघून गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराजवळील रामपूर येथे तो वास्तव्यास होता. आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांचे भविष्य पाहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता.

५ मे रोजी त्याच्या मुलीचे गावात लग्न झाले. अन् ६ मे रोजी सकाळी करमना येथे त्याच्या घरी बंडूचे अपघातात निधन झाल्याचा दूरध्वनी आला. तेव्हा त्याचे वडील, भाऊ, पत्नी व नातेवाईक राजुरा येथे पोहोचले. प्रेत दाखविण्यात आले. चेहरा ओळखू येत नव्हता पण चेहर्‍याची ठेवण व शरीरयष्टी यावरून हा आपलाच बंडू आहे, अशी ओळख पटविली. ४ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. प्रेत ताब्यात घेतले. बर्फाची लादी घेवून प्रेत गावी आणले. आंघोळ घालता येत नसल्याने पायावरच पाणी टाकण्यात आले. गावकरी नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रीतिरिवाजाप्रमाणे तिसर्‍या दिवसाचा विधी केली आणि चौथ्या दिवशी देवकारण केले. बंडूच्या नावे चांदीचा देव करण्यात आला. तो देव्हार्‍यात ठेवण्यात आला. गरिबीत गरिबी सुमारे २५ हजार रुपये या सर्व विधीवर खर्च करण्यात आला. बंडू तर गेला. त्याच्या आठवणीत त्याचे कुटुंब अश्रू ढाळीत होते आणि अचानक सोमवार १२ दि. मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास राजुर्‍यावरून पुन्हा एकदा दूरध्वनी आला