शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पवार-तटकरे भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे; चंद्रशेखर बावनकुळेंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:22 IST

Nagpur : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका मांडत या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका मांडत या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवार यांच्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक विषयांमध्ये साथ दिली आहे. त्या अनुषंगाने कधी-कधी आपल्या स्नेहींसोबत चर्चा करावीशी वाटते. मीसुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आलो आहे. अशा भेटींना राजकीय संदर्भातून पाहणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.

मतीन पटेलविरोधात झालेल्या बुलडोझर कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. निदा खानसारख्या गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारे आश्रय देणे चुकीचे आहे. पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली असावी. समाजाला हादरवणाऱ्या गुन्ह्यांतील आरोपींना मदत करणे योग्य नाही, ही संस्कृती सर्व पक्षांनी पाळली पाहिजे, असे ते म्हणाले. परभणीतील वाळूमाफिया आरोपींना आम्ही सोडणार नाही. यापूर्वी बुलढाण्यात तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.

इंदिरा गांधींनीही सोने खरेदी न करण्याचे केले होते आवाहन

  • यावेळी बावनकुळे यांनी इंधन व सोने खरेदीबाबतही वक्तव्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक वेळा सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही तसेच आवाहन केले होते.
  • महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. देश मजबूत करण्यासाठी काही काळ काही प्रमाणात काटकसर करावी लागली, तर त्यात काहीच गैर नाही. स्वदेशीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर करून आपण सहज जीवन जगू शकतो, असे बावनकुळे म्हणाले.
English
हिंदी सारांश
Web Title : Pawar-Tatkare meeting shouldn't be politicized: Chandrashekhar Bawankule.

Web Summary : Chandrashekhar Bawankule downplayed political speculation surrounding the Pawar-Tatkare meeting, emphasizing their long-standing relationship. He also addressed the Matin Patel case, supporting police action and urging parties to avoid protecting criminals. Bawankule advocated for economic prudence and embracing self-reliance, citing historical appeals for reduced gold consumption.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेsunil tatkareसुनील तटकरेSharad Pawarशरद पवारnagpurनागपूर