शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन १५ पासून

By admin | Updated: February 7, 2015 02:11 IST

अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने बुद्धा स्पिरिच्युअल पार्क सिंहोरा कन्हान येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

नागपूर : अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने बुद्धा स्पिरिच्युअल पार्क सिंहोरा कन्हान येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसीय या धम्म संमेलनामध्ये थायलंडच्या राजकुमारी (प्रिन्सेस) मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासंबंधात अधिक माहिती देताना बुद्धा स्पिरिच्युअल पार्कचे संस्थापक नितीन गजभिये यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हे धम्म संमेलन बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे होणार आहे. श्रीलंका येथील महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा यांच्या हस्ते धम्म संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्म संमेलनामध्ये बांगलादेशचे भदंत वरसंबोधी, भारतातील श्रीलंकेचे उच्चायुक्त प्रो. सुदर्शन सेनवीरत्ने, भदंत सदानंद महास्थवीर, भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आपले विचार व्यक्त करतील. या धम्म संमेलनासाठी थायलंडच्या प्रिंसेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. रविवारी त्यांचे नागपुरात आगमन होईल. सोमवार १६ फेब्रुवारी रोजी त्या नागपूर शहरातील विविध बुद्धविहारांना भेटी देतील. दीक्षाभूमीचे दर्शन घेतील. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल, बुद्धभूमी खैरी, नागलोक, इंदोरा बुद्ध विहार आदींना भेटी देतील. पत्रपरिषदेत प्रसिद्ध आंबेडकरी गायक प्रकाश पाटणकर, आवाज इंडिया चॅनलचे संचालक अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे, राजीव झोडापे उपस्थित होते.