शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश

By admin | Updated: June 12, 2015 02:49 IST

मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर खराब रोडच्या चौपदरीकरणासाठी १० किलोमीटरपर्यंतची झाडे कापण्याचा मार्ग मोकळा

हायकोर्ट : मनसर-खवासा रोडची दुरवस्थानागपूर : मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर खराब रोडच्या चौपदरीकरणासाठी १० किलोमीटरपर्यंतची झाडे कापण्याचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित २७ किलोमीटर रोडवरील कापावयाच्या झाडांचे २४ जूनपर्यंत मूल्यांकन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिलेत. वन विभागातर्फे झाडांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकनानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अहवाल सादर करण्यात येईल. त्यानुसार प्राधिकरणने आवश्यक रक्कम वन विभागाकडे जमा केल्यानंतर रोडच्या चौपदरीकरणाला सुरुवात करता येईल. न्यायालयाने १० किलोमीटर (किलोमीटर क्र. ६७९ ते ६८९) रोडवरील झाडे कापण्याचे आदेश उन्हाळ्याच्या सुट्यांपूर्वीच दिले होते. परंतु, वन विभागामुळे यासंदर्भात वाद निर्माण झाला होता. सृष्टी पर्यावरण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादातून झाडे कापण्यावर स्थगनादेश मिळविल्यानंतर ८ मे रोजी मुख्य वनसंरक्षकांनी नागपूर येथील अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून झाडे कापण्याचे काम थांबवायला लावले होते. यावरून ११ जून रोजी उच्च न्यायालयाने वन विभागाची कानउघाडणी केली होती. उच्च न्यायालयापेक्षा हरित लवादाचा आदेश मोठा आहे काय अशी विचारणा करून झाडे कटाई थांबविण्याचा आदेश मागे न घेतल्यास अवमाननेची कारवाई करण्याची तंबी दिली होती. यानंतर वन विभागाने वादग्रस्त आदेश मागे घेतला होता. मनसर-खवासा रोडच्या दुरवस्थेची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)