शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयुक्त मिळेना !

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे.

अर्जदार त्रस्त : प्रलंबित अपिलांची संख्या वाढली
औरंगाबादच्या आयुक्तांकडे प्रभार
नागपूर : भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या राज्य माहिती आयुक्तांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अपिलांवर सुनावणी होणार कशी? परिणामी प्रलंबित अपिलांची संख्या वाढली आहे.
माहिती अधिकाराबाबत नागरिक आता जागरूक होऊ लागले आहेत. नागरिकांच्या आवश्यकतेसाठी अनेक कार्यकर्ते माहिती अधिकाराचा वापर करू लागले आहे. यापैकी बहुतेकांना पहिल्या प्रयत्नात माहिती नाकारण्याचेच प्रकार अधिक होत असतात. माहिती दिलीच तर ती अर्धवट देण्याचे प्रकारही घडतात. अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी आणि अर्जदाराला योग्य माहिती मिळावी या उद्देशाने राज्य माहिती आयोगाकडे अपिल सादर करता येते. आयोग यावर सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय देतात. यात अर्जदाराला न्याय मिळतो. संबंधित दोषी अधिकार्‍यावर कारवाईची शिफारस केली जाते. नागपूर हे विभागीय केंद्र आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांचा यात समावेश होतो. इतकेच नव्हे तर नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचेही शहर आहे. त्यामुळे राज्य माहिती आयोगाचे खंडपीठ नागपुरात स्थापित करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत नागपूरच्या माहिती आयुक्तांकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी असायची परंतु सध्या नागपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून माहिती आयुक्तच नाही. त्यामुळे अपिलांवर सुनावणी प्रलंबित असल्याने अर्जदार त्रस्त झाले आहे. यातूनच घाट रोड येथील अंकित अरविंद जालान नावाच्या एका अर्जदारांने माहिती आयोगाकडेच एकूण अपिलांबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना १९ जुलै २0१३ पासून नागपुरात माहिती आयुक्तांचे पद रिक्त असल्याची माहिती खुद्द राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाचे जन माहिती अधिकारी अ.र. कारदार यांनी दिली आहे. मार्च २0१३ ते मार्च २0१४ या एका वर्षात तब्बल १९४८ अपील प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)
■ नागपूरच्या माहिती आयुक्तांचा भार औरंगाबाद येतील माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात येऊन पाच दिवस सुनावणी घेतली होती. त्यात २00 वर प्रकरणे त्यांनी निकाली काढली. परंतु आपले नियमित काम सोडून त्यांना नागपूरला वारंवार येणे शक्य नाही.