शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाचा खून

By admin | Updated: June 9, 2015 02:49 IST

मोमीनपुरा येथील कुख्यात गुन्हेगार शेख जुम्मन (३४) याचा सोमवारी जरीपटका हद्दीतील पंजाबी लाईनस्थित भैंसासूर

नागपूर : मोमीनपुरा येथील कुख्यात गुन्हेगार शेख जुम्मन (३४) याचा सोमवारी जरीपटका हद्दीतील पंजाबी लाईनस्थित भैंसासूर मैदानात गळा कापून खून करण्यात आला. मृत हा कुख्यात गुन्हेगार असून गार्ड लाईन येथील चर्चित दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी असल्याचे सांगितले जाते. दुहेरी हत्याकांडापासून शेख जुम्मन हा मोमीनपुरा सोडून यशोधरानगर येथील माजरी झोपडपट्टीत राहायला गेला होता. सोमवारी सायंकाळी ५ वाजता पोलिसांना खुनाची माहिती मिळाली. त्याचा गळा कापून मृतदेह झुडपात फेकला होता. काही जण शौचासाठी मैदानातील झुडपात गेले असता त्यांना मृतदेह आढळून आला. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पंजाबी लाईन येथील करिया, गड्डीगोदाम येथील डामनिक, बंडू आणि त्याचे दोन साथीदार यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत विचारपूस सुरू आहे. सूत्रांनुसार जुम्मन हा जुगार खेळण्यासाठी कुख्यात असलेल्या भैंसासूर मैदानात नेहमीच येत असे. या मैदानात कुख्यात गुंडा करियासुद्धा आपल्या साथीदारासोबत जुगार अड्डा चालवीत होता. जुम्मनची करिया व त्याच्या साथीदारांसोबत मैत्री होती. त्यामुळे तो नेहमीच गड्डीगोदाम परिसरात फिरत होता. सोमवारी सकाळी तो करिया व त्याच्या साथीदारांसोबतच फिरत होता. कामठी रोडवरील एका दारूच्या दुकानातही ते गेले होते. दुपारपर्यंत सर्वजण दारू पित होते. त्यानंतर सर्वजण पंजाबी लाईनकडे निघून गेले. त्यानंतर सायंकाळी जुम्मनचा खून झाल्याची बातमी पसरली.